खंडाळ्यात अतिक्रमणविरोधी धडक मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:38 IST2021-03-19T04:38:43+5:302021-03-19T04:38:43+5:30
खंडाळा : खंडाळा नगरपंचायतीच्या हद्दीत महसूल विभाग, नगरपंचायत, बांधकाम व पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाई करत अतिक्रमणांविरोधात धडक मोहीम राबविली. ...

खंडाळ्यात अतिक्रमणविरोधी धडक मोहीम
खंडाळा : खंडाळा नगरपंचायतीच्या हद्दीत महसूल विभाग, नगरपंचायत, बांधकाम व पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाई करत अतिक्रमणांविरोधात धडक मोहीम राबविली. रस्त्याच्या दुतर्फा असणारे अतिरिक्त बांधकाम, पत्र्याचे शेड, टपऱ्या हटवून अतिक्रमण काढण्यात आले. त्यामुळे अनेक वर्षांनंतर खंडाळा शहराने मोकळा श्वास घेतला.
खंडाळा शहरात मुख्य रस्त्यानेच बाजारपेठ आहे. बाजारपेठेतील सर्वच दुकानदार, व्यापाऱ्यांनी गाळ्यासमोर सावलीसाठी शेड उभारले होते. तसेच रस्त्यावरच पायऱ्यांचे बांधकाम केले होते. त्यामुळे शहरात गाडी पार्किंगला जागाच उरली नव्हती. वाहतुकीला मोठी अडचण निर्माण होत होती तसेच राजमाता अहिल्यादेवी चौक ते छत्रपती शिवाजी चौक तसेच पंचायत समिती आवारात ठिकठिकाणी रस्त्याच्या फूटपाथवरच अनेक टपऱ्या टाकल्याने सर्वत्र बकाल अवस्था झाली होती. आठवडी बाजारादिवशी तर शहरात फिरायला जागाच उरत नव्हती. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने तहसीलदार दशरथ काळे, मुख्याधिकारी डॉ. योगेश डोके, सार्वजनिक बांधकामचे उपकार्यकारी अभियंता आय. के. मोदी, पोलीस निरीक्षक मेहश इंगळे यांनी संयुक्त कारवाई करीत अतिक्रमणे हटविली .
शहरात सकाळी सात वाजल्यापासून सायंकाळपर्यंत ही कारवाई सुरू होती. मुख्य गावठाणात सरसकट कारवाई सुरू झाल्यानंतर काही दुकानदारांनी स्वतःहून अतिक्रमण काढून टाकले. प्रशासनाने जेसीबीच्या साह्याने इतर ठिकाणची अतिरिक्त बांधकामे काढली. वास्तविक, या कारवाईने शहरातील मुख्य रस्ता मोकळा झाला. मात्र याबाबत संमिश्र प्रतिक्रीया उमटल्या गेल्या.
चौकट...
मोठ्या इमारतीसमोरचे कट्टेही काढले..
या कारवाईत पूर्वी खंडाळा ग्रामपंचायतीने मराठी शाळेबाहेर बांधलेले गाळेही तोडण्यात आले. तसेच इतर खासगी टपऱ्याही काढण्यात आल्या. त्यामुळे अतिक्रमण काढताना कोणासही सूट देण्यात आली नाही. तसेच मोठ्या इमारतीसमोरचे कट्टेही काढून टाकण्यात आले आहेत.
चौकट..
शहराला पोलीस छावणीचे रूप..
शहरात कारवाई करण्यापूर्वी पोलीस संचलन करण्यात आले. त्यानंतर शहरातील सर्व रस्त्यावर ठिकठिकाणी पोलीस निरीक्षक महेश इंगळे यांच्या नियंत्रणाखाली पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे शहरात पोलीस छावणीचे रूप आले होते. या मोहिमेसाठी पाच अधिकारी व शंभर अतिरिक्त पोलीस कुमक व दंगा नियंत्रण पथक बोलविण्यात आले होते.
कोट....
शहरात प्रशासनाने अतिक्रमण मोहीम राबविली ही बाब चांगली आहे. मात्र त्याची पद्धत चुकीची होती. स्थानिक रहिवासी व दुकानदारांना याबाबत कोणतीही नोटीस दिली नाही. अतिक्रमण काढण्यासाठी कालावधी दिला नाही. गावातील रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे; पण त्यांनी नगरपंचायतीकडून नोटीस देणे गरजेचे होते. या रस्त्याची अतिक्रमणे काढायची होती तर ती महामार्गापासून काढायला हवी होती. या कारवाईत सर्वांना समान न्याय दिला नाही. दुजाभाव करून केलेल्या कारवाई योग्य नाही.
-शैलेश गाढवे, रहिवासी खंडाळा
18खंडाळा
खंडाळा नगरपंचायतीकडून गुरुवारी शहरात रस्त्याच्या दुतर्फा असणारे अतिरिक्त बांधकाम, पत्र्याचे शेड, टपऱ्या हटवून अतिक्रमण काढण्यात आले.शहराने घेतला मोकळा श्वास ; छोट्या व्यावसायिकांचे नुकसान
लोकमत न्यूज नेटवर्क
खंडाळा : खंडाळा नगरपंचायतीच्या हद्दीत महसूल विभाग, नगरपंचायत, बांधकाम व पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाई करीत अतिक्रमणविरोधात धडक मोहीम राबविली. रस्त्याच्या दुतर्फा असणारे अतिरिक्त बांधकाम, पत्र्याचे शेड, टपऱ्या हटवून अतिक्रमण काढण्यात आले. त्यामुळे अनेक वर्षांनंतर खंडाळा शहराने मोकळा श्वास घेतला.
खंडाळा शहरात मुख्य रस्त्यानेच बाजारपेठ आहे. बाजारपेठेतील सर्वच दुकानदार, व्यापाऱ्यांनी गाळ्यासमोर सावलीसाठी शेड उभारले होते. तसेच रस्त्यावरच पायऱ्यांचे बांधकाम केले होते. त्यामुळे शहरात गाडी पार्कींगला जागाच उरली नव्हती. वाहतुकीला मोठी अडचण निर्माण होत होती. तसेच राजमाता अहिल्यादेवी चौक ते छत्रपती शिवाजी चौक तसेच पंचायत समिती आवारात ठिकठिकाणी रस्त्याच्या फूटपाथवरच अनेक टपऱ्या टाकल्याने सर्वत्र बकाल अवस्था झाली होती. आठवडी बाजारादिवशी तर शहरात फिरायला जागाच उरत नव्हती. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने तहसीलदार दशरथ काळे, मुख्याधिकारी डॉ. योगेश डोके, सार्वजनिक बांधकामचे उपकार्यकारी अभियंता आय. के. मोदी, पोलीस निरीक्षक मेहश इंगळे यांनी संयुक्त कारवाई करीत अतिक्रमणे हटविली .
शहरात सकाळी सात वाजल्यापासून सायंकाळपर्यंत ही कारवाई सुरू होती. मुख्य गावठाणात सरसकट कारवाई सुरू झाल्यानंतर काही दुकानदारांनी स्वतःहून अतिक्रमण काढून टाकले. प्रशासनाने जेसीबीच्या साह्याने इतर ठिकाणची अतिरिक्त बांधकामे काढली. वास्तविक, या कारवाईने शहरातील मुख्य रस्ता मोकळा झाला. मात्र याबाबत संमिश्र प्रतिक्रीया उमटल्या गेल्या.
चौकट...
मोठ्या इमारतीसमोरचे कट्टेही काढले..
या कारवाईत पूर्वी खंडाळा ग्रामपंचायतीने मराठी शाळेबाहेर बांधलेले गाळेही तोडण्यात आले तसेच इतर खासगी टपऱ्याही काढण्यात आल्या. त्यामुळे अतिक्रमण काढताना कोणासही सूट देण्यात आली नाही तसेच मोठ्या इमारतीसमोरचे कट्टेही काढून टाकण्यात आले आहेत.
चौकट..
शहराला पोलीस छावणीचे रूप..
शहरात कारवाई करण्यापूर्वी पोलीस संचलन करण्यात आले. त्यानंतर शहरातील सर्व रस्त्यावर ठिकठिकाणी पोलीस निरीक्षक महेश इंगळे यांच्या नियंत्रणाखाली पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे शहरात पोलीस छावणीचे रूप आले होते. या मोहिमेसाठी पाच अधिकारी व शंभर अतिरिक्त पोलीस कुमक व दंगा नियंत्रण पथक बोलविण्यात आले होते.
कोट....
शहरात प्रशासनाने अतिक्रमण मोहीम राबविली ही बाब चांगली आहे. मात्र त्याची पद्धत चुकीची होती. स्थानिक रहिवासी व दुकानदारांना याबाबत कोणतीही नोटीस दिली नाही. अतिक्रमण काढण्यासाठी कालावधी दिला नाही. गावातील रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे; पण त्यांनी नगरपंचायतीकडून नोटीस देणे गरजेचे होते. या रस्त्याची अतिक्रमणे काढायची होती तर ती महामार्गापासून काढायला हवी होती. या कारवाईत सर्वांना समान न्याय दिला नाही. दुजाभाव करून केलेल्या कारवाई योग्य नाही.
-शैलेश गाढवे, रहिवासी खंडाळा
18खंडाळा०१/०२
खंडाळा नगरपंचायतीकडून गुरुवारी शहरात रस्त्याच्या दुतर्फा असणारे अतिरिक्त बांधकाम, पत्र्याचे शेड, टपऱ्या हटवून अतिक्रमण काढण्यात आले.