बुधचा राजवाडा मोजतोय अखेरच्या घटका
By Admin | Updated: February 9, 2015 00:41 IST2015-02-08T23:54:32+5:302015-02-09T00:41:47+5:30
संवर्धनाची गरज : भिंती जमीनदोस्त; बुरुजही लागले ढासळू

बुधचा राजवाडा मोजतोय अखेरच्या घटका
बुध : बुध संस्थानाचा इतिहास सांगणारा व दिमाखात उभ्या असलेल्या राजवाड्याला घरघर लागली आहे. पूर्वाभिमुखी असलेल्या वाड्याच्या चारही बाजूंच्या भिंती ढासळत असून उरले सुरलेले बुरुजही शेवटच्या घटका मोजत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. बुधमधील झुंझारराव घाडगे यांचा हा राजवाडा. त्याकाळात बुध या छोटेखानी संस्थानाचा मोठा दबदबा होता; पण काळाच्या ओघात सर्वकाही नाहीसे होत गेले. राजवाड्याचे प्रवेशव्दार मात्र अजून सुस्थितीत असून भव्य प्रवेशव्दार वैभवसंपन्न काळाची साक्ष देत आहे. अनेक इतिहासप्रेमी या राजवाड्याचे अवशेष व प्रवेशव्दार पाहायाला येत असतात; पण या राजवड्याविषयी नागरिकांच्या उदासीनतेच्या भूमिकेमुळे त्यांची नाराजी होत आहे. (वार्ताहर) झाडाझुडपांचे साम्राज्य या वाड्यात सध्य मोठ्या प्रमाणात घाणीचे व झुडप्यांचे साम्राज्य पसरले आहे. बुध गावाच्या मधोमध असलेला वाडा सध्या नागरिकांच्या अडचणीत वाढ करत आहे. कारण या वाड्याची मोठ्या प्रमणात पडछड होत आहे. वाड्याच्या भिंती ढासळत असल्याने या भिंतीच्या कडेला बाहेरच्या बाजूला अनेकांची घरे असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. स्वच्छता केल्यास मिळेल झळाळी या वाड्याचे दोन बुरुज मागील बाजूस असून तेही एका बाजूने ढासळत चालले आहेत. वाड्याची अखेरची वाटचाल सुरू असून मातीचे ढिगारे हटवल्यास वाड्याला झळाळी मिळेल आणि पुन्हा गतवैभव प्राप्त होऊन बुध गावात अनेक इतिहासपे्रमीची पावले वळतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.