गाडीचे हप्ते थकल्याने व्यावसायिकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:49 IST2021-09-16T04:49:23+5:302021-09-16T04:49:23+5:30

सातारा : नवीन गाडीचे हप्ते थकल्याने एका व्यावसायिकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सातारा तालुक्यातील चिंचणेर निंब येथे दि. ...

Businessman commits suicide due to exhaustion of car installments | गाडीचे हप्ते थकल्याने व्यावसायिकाची आत्महत्या

गाडीचे हप्ते थकल्याने व्यावसायिकाची आत्महत्या

सातारा : नवीन गाडीचे हप्ते थकल्याने एका व्यावसायिकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सातारा तालुक्यातील चिंचणेर निंब येथे दि. १४ रोजी घडली.

विठ्ठल गोरख जाधव (वय ५५, रा. चिंचणेर, निंब, ता. सातारा) असे आत्महत्या केलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विठ्ठल जाधव यांनी कोरोनापूर्वी व्यवसायासाठी नवीन पिकअप टेम्पो घेतला. मात्र, कोरोनामुळे व्यवसाय बंद पडला. त्यामुळे नवीन गाडीचे हप्ते बॅंकेमध्ये भरले गेले नाहीत. हे हप्ते थकल्यामुळे ते नैराश्यात होते. यातूनच त्यांनी मंगळवारी सायंकाळी राहत्या घराच्या पत्र्याच्या खाली लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे घरातल्यांच्या निदर्शनास आले. यानंतर त्यांनी सातारा तालुका पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविला.

Web Title: Businessman commits suicide due to exhaustion of car installments