बसस्थानकातील विक्रेत्यांच्या संसाराची गाडी पुन्हा रूळावर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:43 IST2021-08-25T04:43:25+5:302021-08-25T04:43:25+5:30
सातारा : कोरोनामुळे सुरू झालेल्या लाॅकडाऊनचा फटका एसटी महामंडळाला सर्वाधिक बसला. किंबहुना त्यापेक्षा जास्त झळ राज्य परिवहन महामंडळाच्या विविध ...

बसस्थानकातील विक्रेत्यांच्या संसाराची गाडी पुन्हा रूळावर!
सातारा : कोरोनामुळे सुरू झालेल्या लाॅकडाऊनचा फटका एसटी महामंडळाला सर्वाधिक बसला. किंबहुना त्यापेक्षा जास्त झळ राज्य परिवहन महामंडळाच्या विविध आगारांमध्ये खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्यांना बसला आहे. आता एसटी सुरळीत सुरू झाल्यामुळे प्रवासी वाढत आहेत. त्यामुळे या खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या संसाराची गाडीही रुळावर आली आहे.
राज्यात कोरोनाचा शिरकाव मार्च २०२० मध्ये झाला. तेव्हापासून सार्वजनिक प्रवासी वाहतूक बंद करावी लागली. तसेच कोरोना वाढण्याचा धोका असल्याने नागरिकही स्वत: होऊनच एसटीने प्रवास करणे टाळत होते. याचा फटका बसस्थानकात खाद्य पदार्थांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना बसला होता.
फोटो १
सातारा मध्यवर्ती बसस्थानक पुणे-कोल्हापूरच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने लांब पल्ल्याच्या गाड्यांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांतून खाद्य पदार्थांना मागणी असते.
फोटो २
लांब पल्ल्याच्या गाड्या सातारा बसस्थानकात येताच खाद्य पदार्थ विक्री करणाऱ्यांची अशा गाड्यांकडे धाव घेतली जाते. अन् प्रवाशांच्या मागणीनुसार पदार्थ दिले जातात.
फोटो ३
काही वेळ थांबून एसटी पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाली तरी एखादा ग्राहक मिळेल या आशेवर विक्रेते गाडीबरोबर काही अंतर जात असतात.
एसटी महामंडळाकडून घ्यावा लागतो परवाना
nराज्य परिवहन महामंडळाच्या आवारात कोणत्याही प्रकारचे खाद्यपदार्थ विनापरवाना विक्री करता येत नाहीत. यासाठी एसटी महामंडळाकडून परवाना काढणे आवश्यक असते.
nबसस्थानकात असलेले उपहारगृहचालकही अशा मुलांची नेमणूक करुन खाद्यपदार्थ एसटीत जाऊन प्रवाशांपर्यंत पोहोच करण्याची गरज निर्माण झालेली असते.