खिंडवाडीजवळ धावती कार जळून खाक

By Admin | Updated: December 29, 2016 00:05 IST2016-12-29T00:05:21+5:302016-12-29T00:05:21+5:30

कुटुंब बचावले : धूर दिसल्यामुळे पूर्व कल्पना आली

Burning car near Khindwadi burns | खिंडवाडीजवळ धावती कार जळून खाक

खिंडवाडीजवळ धावती कार जळून खाक

शेंद्रे : येथील खिंडवाडीजवळ धावत्या कारला शॉटसर्किटने आग लागल्याने संपूर्ण कार जळून खाक झाली. मात्र, सुदैवाने कारमधून धूर येत असल्याचे चालकाच्या निदर्शनास आल्याने सर्वजण खाली उतरले. त्यामुळे हे बालंबाल बचावले. ही घटना बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, धनंजय दगडू माने हे आपल्या कुटुंबासमवेत कारमधून नागठाणेहून वाईला निघाले होते. खिंडवाडीजवळ ही कार आली असता कारमधून अचानक धूर येऊ लागला. चालकाच्या हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर कारमधून सगळ्यांना खाली उतरविले. त्यानंतर काहीक्षणात कारने पेट घेतला. हवेमुळे आग भडकत होती. काही नागरिकांनी अग्निशमक दलाला याची माहिती दिली. सुमारे पंधरा-वीस मिनिटांनंतर अग्निशमक दल घटनास्थळी पोहोचले. परंतु तोपर्यंत कार पूर्णपणे जळून खाक झाली होती.
पेटलेली कार पाहण्यासाठी नागरिकांनी महामार्गावर गर्दी केली होती. त्यामुळे वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक पूर्ववत केली. रात्री उशिरापर्यंत या घटनेची शहर पोलिस ठाण्यात नोंद झाली नव्हती. (वार्ताहर)

Web Title: Burning car near Khindwadi burns