मान्याचीवाडी येेथे आगीत दोन शेड जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:39 IST2021-04-27T04:39:06+5:302021-04-27T04:39:06+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ढेबेवाडी : अचानकपणे लागलेल्या आगीत जनावरांची दोन शेड जळून खाक झाल्याची घटना मान्याचीवाडी (ता. पाटण) येथे ...

Burn two sheds in a fire at Manyachiwadi | मान्याचीवाडी येेथे आगीत दोन शेड जळून खाक

मान्याचीवाडी येेथे आगीत दोन शेड जळून खाक

लोकमत न्यूज नेटवर्क

ढेबेवाडी : अचानकपणे लागलेल्या आगीत जनावरांची दोन शेड जळून खाक झाल्याची घटना मान्याचीवाडी (ता. पाटण) येथे घडली. रविवारी दुपारच्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेत सुदैवाने जीवित हानी झाली नाही.

रविवारी दुपारी एकच्या सुमारास कमल जिजाबा माने यांच्या जनावरांच्या शेडला अचानक आग लागली. यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या ग्रामस्थांच्या ही बाब निदर्शनास आली. त्यांनी लगेचच आरडाओरडा केला. यामुळे गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आग विझविण्यासाठी सर्वजण प्रयत्न करत होते. मात्र आगीने रौद्ररूप धारण केल्याने पाण्याच्या माऱ्यानेही आग आटोक्यात येत नव्हती. याचवेळी शेजारी असलेल्या तानाजी माने यांच्या शेडनेही पेट घेतला. मात्र ग्रामस्थांनी जिद्दीने प्रयत्न चालूच ठेवले. अखेर एक तासाच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आली.

या घटनेत दोन जनावरे वाचविण्यात यश आले; पण धान्य, चारा, सरपण आणि शेती अवजारे जळून खाक झाली. या घटनेची माहिती पाटणचे तहसीलदार योगेश्वर टोम्पे, तलाठी बी. आर. पाटील, ग्रामसेवक प्रसाद यादव यांना देण्यात आली आहे.

Web Title: Burn two sheds in a fire at Manyachiwadi