साताऱ्यात पावणेचार लाखांची घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:32 IST2021-01-15T04:32:44+5:302021-01-15T04:32:44+5:30

सातारा : शहरातील विसावा नाका परिसरात असणाऱ्या एका अपार्टमेंटमधील बंद फ्लॅटचा दरवाजा तोडून चोरट्यांनी सात तोळे सोन्याचे दागिने आणि ...

Burglary of Rs 54 lakh in Satara | साताऱ्यात पावणेचार लाखांची घरफोडी

साताऱ्यात पावणेचार लाखांची घरफोडी

सातारा : शहरातील विसावा नाका परिसरात असणाऱ्या एका अपार्टमेंटमधील बंद फ्लॅटचा दरवाजा तोडून चोरट्यांनी सात तोळे सोन्याचे दागिने आणि रोकड असा पावणेचार लाखांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, सुषमा प्रकाश माने (वय ३९, रा. अरुणोदय आर्केड‌्स, विसावा नाका, सातारा) यांचा ब्यूटिपार्लरचा व्यवसाय आहे. सोमवारी (दि. ११) सायंकाळी साडेपाच ते मंगळवारी (दि. १६) दुपारी ४ वाजेपर्यंत त्या घरी नसल्याने त्यांच्या फ्लॅटला कुलूप होते. या कालावधीत अज्ञात चोरट्याने त्यांच्या बंद फ्लॅटचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. किचनमध्ये असणाऱ्या कपाटातील सात तोळे सोन्याचे दागिने तसेच बेडरूममध्ये असलेल्या लाकडी काउण्टरचा ड्रावरमधील रोकड चोरून नेली. ही घटना लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ सातारा पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक संदीप मोरे करत आहेत.

Web Title: Burglary of Rs 54 lakh in Satara