शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात अपघातात मृत्यू झालेला बैल कुडाळमध्ये टाकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 15:29 IST

Crimenews Satara police : सरताळे, ता. जावळी येथे एका बैलाचा मृतदेह आढळून आल्यानंतर त्या बैलाची हत्या झाल्याचे बोलले जाऊ लागले. मात्र, मेढा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केल्यानंतर यातील वेगळाच प्रकार समोर आला. पुणे ग्रामीण हद्दीतील किकली या गावामध्ये शर्यतीच्या बैलाचा अपघात झाला. त्यानंतर त्या बैलाचा मृतदेह रात्रीच्या सुमारास सरताळेजवळ आणून टाकला असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले.

ठळक मुद्देपुण्यात अपघातात मृत्यू झालेला बैल कुडाळमध्ये टाकला अज्ञातावर गुन्हा; टेम्पोला बांधून ओढताना मोडले पाय

सातारा : सरताळे, ता. जावळी येथे एका बैलाचा मृतदेह आढळून आल्यानंतर त्या बैलाची हत्या झाल्याचे बोलले जाऊ लागले. मात्र, मेढा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केल्यानंतर यातील वेगळाच प्रकार समोर आला. पुणे ग्रामीण हद्दीतील किकली या गावामध्ये शर्यतीच्या बैलाचा अपघात झाला. त्यानंतर त्या बैलाचा मृतदेह रात्रीच्या सुमारास सरताळेजवळ आणून टाकला असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले.याप्रकरणी मेढा पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मेढा पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सरताळे, ता. जावळी परिसरातील निर्जनस्थळी एका झाडाजवळ सोमवारी सकाळी एका बैलाचा मृतदेह आढळून आला होता. या बैलाची हत्याच करण्यात आली, अशी चर्चा सुरू झाली. त्यामुळे मेढा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास तत्काळ सुरू केला. त्या वेळी धक्कादायक माहिती समोर आली.

पुणे ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत किकली हे गाव आहे. या गावच्या परिसरात शर्यतीच्या बैलाचा अपघात झाला. त्या अपघातात बैलाचा मृत्यू झाला. संबंधिताने बैलाची भरपाईसुद्धा घेतली. पण आता या बैलाचा मृतदेह टाकायचा कुठे, असा प्रश्न संबंधिताना पडला. सरतेशेवटी एका टेम्पोमधून बैलाचा मृतदेह जावळी तालुक्यातील सरताळे या ठिकाणी आणला.

महामार्गावरून रात्रीच्या सुमारास निर्जनस्थळी शोधून बैल टेम्पोतून खाली टाकला. मात्र, रस्त्यापासून मृतदेह बाजूला नेताना त्यांनी बैलाचा पायाला दोर बांधला. त्यानंतर टेम्पोने ओढत नेला. त्यामुळे या बैलाचे पाय मोडले. या प्रकरणी संबंधितांवर मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसरPoliceपोलिस