बजेट २०२१
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:17 IST2021-02-05T09:17:01+5:302021-02-05T09:17:01+5:30
यंदाच्या बजेटमध्ये शेतीसाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे. अर्थमंत्र्यांनी गावातील बाजारपेठा शहराशी जोडणार असल्याचे सांगतानाच नवी भाजी मंडई उभारणी ...

बजेट २०२१
यंदाच्या बजेटमध्ये शेतीसाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे. अर्थमंत्र्यांनी गावातील बाजारपेठा शहराशी जोडणार असल्याचे सांगतानाच नवी भाजी मंडई उभारणी करण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या निर्णयाने शेती व शेतक-यांना दिलासा मिळेल, असे वाटते.
- सुभाष माने, भाजीपाला विक्रेता
२.
कोरोनामुळे यंदा व्यापार, उद्योगाला मोठा फटका बसला आहे. या उद्योग, व्यवसायांना उभारी मिळावी, यासाठी बजेटमध्ये विशेष तरतूद करण्यात आली नाही. कापूस आणि रेशीम उत्पादनावरील आयात शुल्कात वाढ करण्यात आली आहे.
- नितीन झोरे, व्यापारी
३.
सरकारने वाहन स्क्रॅपिंग धोरण योजना जाहीर केली आहे. याचा सर्वसामान्यांना मोठा फटका बसणार आहे. पेट्रोल आणि डिझेलवर कृषी सेस वाढविण्याचे संकेत बजेटमध्ये देण्यात आले आहेत. या इंधनदरवाढीचादेखील व्यवसायावर परिणाम होणार आहे.
- शंकर लोखंडे, रिक्षाचालक