शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
6
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
7
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
8
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
9
हृदयविकाराच्या झटक्याने प्रसिद्ध मराठी अभिनेता-दिग्दर्शकाचं निधन; ४२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
12
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
13
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
14
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
15
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
16
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
17
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
18
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
19
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
20
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

Budget 2018 : सरकारचा खिसा फाटका, बाता मात्र हजारो कोटींच्या - राज ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2018 12:56 IST

देशात आणीबाणीसदृष्य परिस्थिती आणणा-या मोदी सरकारचा खिसा पूर्णपणे फाटका बनलाय - राज ठाकरे

सातारा - ‘देशात आणीबाणीसदृष्य परिस्थिती आणणा-या मोदी सरकारचा खिसा पूर्णपणे फाटका बनलाय, मात्र त्यांच्या बाता हजारो कोटींच्या भाषेत सुरू झाल्यात. जनतेला मूर्खात काढण्याचे दिवस आता संपले असून येत्या निवडणुकीत भाजपा सरकारचा पराभव अटळ आहे,’ असा ठाम विश्वास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी साता-यात व्यक्त केला.

राज ठाकरे पुढे असंही म्हणाले की, ‘ऊठ सूठ गुजरातच्या खोट्या प्रतीमेचा उदोउदो करून संपूर्ण देशाला वेड्यात काढण्याचे काम सध्या सुरू आहे. परदेशातील कोणतीही प्रमुख व्यक्ती देशात आली तर तिला केवळ गुजरातमध्येच नेले जाते. का? आमचा महाराष्ट्र नाही का? केरळ, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश अन् मध्य प्रदेशसारख्या राज्यात विकास झाला नाही का? आज मांडण्यात आलेला अर्थसंकल्प देशाचा नसून केवळ आगामी निवडणुकीचा आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पावर माझा कदापिही विश्वास नाही.’ 

‘पश्चिम महाराष्ट्राची क्षमता तशी खूप आहे. मात्र याची जाणीव पश्चिम महाराष्ट्रालाच नाही. वर्षानुवर्षे त्याच त्या बाता मारून जनतेला अंधारात ठेवण्याचे काम आजपर्यंतच्या नेत्यांनी केले आहे. म्हणूनच प्रत्येक वेळी मी कळवळून सांगत असतो की, एकदा तरी माझ्यावर विश्वास ठेवा. मला सत्ता देऊन बघा. मात्र विकासावर निवडणुका जिंकता येत नाहीत, असे वाटू लागले आहे. नाशिकमध्ये मला हा अनुभव आला आहे.’ 

‘मी सत्य बोलतो. त्याचे परिणाम भोगण्यास मी तयार असतो. मात्र, मी जे बोलतो ते काही वर्षांनंतर तसेच घडते, तेव्हा माझ्या बोलण्याचे महत्त्व जनतेला कळते. २०१५ सालीच मी गौप्यस्फोट केला होता की, पुढच्या काही वर्षांत सतत जातीय दंगली घडविल्या जातील. माझ्या त्या वेळच्या बोलण्याची सत्यता आता लोकांना कळू लागली आहे,’ असेही राज ठाकरे यांनी शेवटी बोलताना सांगितले.

 

टॅग्स :Budget 2018अर्थसंकल्प २०१८Raj Thackerayराज ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदीArun Jaitleyअरूण जेटली