बुद्धांचे विचार मानवाच्या प्रगतीला तारणारे

By Admin | Updated: June 5, 2016 00:46 IST2016-06-05T00:46:04+5:302016-06-05T00:46:04+5:30

भन्ते सारीपुत्त : तरडगावात श्रामणेर संघाचे उत्साहात स्वागत

Buddha's thoughts save the human progress | बुद्धांचे विचार मानवाच्या प्रगतीला तारणारे

बुद्धांचे विचार मानवाच्या प्रगतीला तारणारे

तरडगाव : ‘विज्ञानावर आधारित असलेल्या बौद्ध धम्म हा एका माणसाने दुसऱ्या माणसाशी कसे वागावे हे शिकवितो. तसेच बुद्धांचे विचार हे मानवाच्या प्रगतीला तारणार असून मनातील द्वेष, लोभ, मोह, लबाडी यांचा त्याग करून प्रज्ञा, शील करूणा यांचा अंगीकार केल्यास जीवन सुखकर होईल,’ असे प्रतिपादन भन्ते बी. सारीपुत्त यांनी केले.
भगवान बुद्धांची शिकवण अंगीकारित प्रचार व प्रसारांच्या माध्यमातून धम्म चळवळ गतिमान करावयास निघालेल्या श्रामणेर संघाचे तरडगाव, ता. फलटण येथे उत्स्फूर्तपणे मंगलमय वातावरणात बौद्ध अनुयायांनी स्वागत केले. यावेळी धम्मदेसना कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात ते बोलत होते.
भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने फलटण तालुक्यातील कोळकी येथे १० दिवसांचे श्रामणेर व बौद्धचार्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातून एकूण २० शिबिरार्थिंनी शिबिरामध्ये सहभाग घेतला आहे. दरम्यान, श्रामणेर संघ हा तरडगाव येथे आला असता बसस्थानकापासून ‘धम्मकुटी’ बुद्ध विहारापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा रांगोळीचा सडा व फुलांचा वर्षाव करीत संघाचे स्वागत करण्यात आले.
यावेळी केंद्रीय शिक्षक अशोक कोरडे, बी. डी. कांबळे, श्रीमंत घोरपडे, नानासो मोहिते, अर्जुन ननावरे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Buddha's thoughts save the human progress