शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

Satara: भुईंज येथे हमालाचा निर्घृण खून, कारण अस्पष्ट

By दत्ता यादव | Updated: November 25, 2023 12:47 IST

मारहाणीनंतर मृतदेह सुमारे शंभर फूट अंतरावर फरफटत नेऊन टाकण्यात आला

भुईंज: येथील पाणी पुरवठा आवारात अज्ञात दोन ते तीन जणांनी अनिल नामदेव कुचेकर (वय ३८, रा. भुईंज, ता. वाई) याचा ऊस, झाडांच्या फांद्यांनी व दगडाने निर्घृण खून केला. ही घटना मध्यरात्री घडली असून, शनिवारी पहाटे हा प्रकार समोर आला.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, भुईंज येथील कृष्णा नदीकाठी असलेल्या ग्रामपंचायतींच्या पाणी पुरवठा स्कीमच्या आवारातून पहाटे काहीजण चालत निघाले होते. त्यावेळी तेथे एका व्यक्तीचा रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह त्यांना दिसला. या प्रकाराची माहिती भुईंज पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसही तातडीने घटनास्थळी पोहोचले. भुईंजमधील ग्रामस्थ त्या ठिकाणी आल्यानंतर हा मृतदेह अनिल कुचेकर याचा असल्याचे निष्पन्न झाले. अनिल हा हमालीचे काम करत होता. अनिलचा मृतदेह पंपहाऊसच्या नजीक मैदानाशेजारी आढळून आला. मृतदेहापासून सुमारे शंभर फूट अंतरावर त्याला मारहाण करण्यात आल्याच्या खूना आहेत. ऊस, झाडाच्या फांद्या, एक मध्यम आकाराचा दगड, तसेच लहान दोन-तीन दगड तसेच नळाच्या पाइपचे तुकडे घटनास्थळी आढळून आले आहेत. मारहाणीनंतर मृतदेह सुमारे शंभर फूट अंतरावर फरफटत नेऊन टाकण्यात आला. अत्यंत निर्दयीपणे त्याचा खून करण्यात आला आहे. कोणत्या कारणातून खून झाला व कोणी केला, हे अद्याप समोर आले नाही. घटनास्थळी सहायक पोलिस निरीक्षक विशाल भंडारे, नितीन जाधव, चंद्रकांत भोसले,संजय धुमाळ आदींनी धाव घेऊन पंचनामा केला.

शेवटचे त्याला दारूच्या दुकानावर पाहिलेशुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास त्याला काहींनी शेवटचे दारूच्या दुकानावर पाहिले होते. त्यावेळी त्याच्यासोबत हमाली करणारे त्याचे दोन सहकारी होते. त्यामुळे हा खून कोणी केला, याचा लवकरच उलगडा होणार आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस