शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Satara Crime: राणंद येथे वृद्धेचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून, जमिनीच्या वादाचा संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 13:36 IST

पोलिसांकडून तपास सुरू

दहिवडी : माण तालुक्यातील राणंद गावच्या हद्दीतील हेळकर पठारावर एका वृद्धेचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून करण्यात आला. ही धक्कादायक घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. हा खून जमिनीच्या वादातून झाला असावा, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. हिराबाई दाजी मोटे (वय ७५), असे खून झालेल्या वृद्धेचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, मृत हिराबाई मोटे यांची मुलगी संगीता खाशाबा कोळेकर या नेहमीप्रमाणे शेतातील कामावरून सोमवार, दि. ८ रोजी घरी परतल्या. तेव्हा आई घरी आढळून न आल्याने त्यांनी त्यांचा भाऊ दत्तात्रय मोटे यांना फोन करून सांगितले. रात्री उशिरापर्यंत शोधाशोध करूनही त्या सापडल्या नाहीत. मंगळवारी सकाळी पुन्हा शोध सुरू करण्यात आला.तिसऱ्या दिवशी बुधवार, दि. १० रोजी सकाळी साडेदहा वाजता संगीता आणि त्यांचा मुलगा संतोष हे रानात गेले. त्यांना हिराबाई यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाची अवस्था पाहून गावकऱ्यांच्या अंगावर शहारे आले. डोक्यात दगड घालून निर्घृण करण्यात आल्याचे दिसून आले.दरम्यान, या घटनेची माहिती पोलिस पाटील अप्पासाहेब गायकवाड यांनी दहिवडी पोलिस ठाण्यात दिली. त्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे, शिखर शिंगणापूरचे पोलिस उपनिरीक्षक मोहन हांगे, नंदकुमार खाडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला. हिराबाई यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सहा नातवंडे असा परिवार आहे. याबाबत अधिक तपास दहिवडी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे हे करीत आहेत.