भाऊ ...सण साजरा हुईल इतकी तरी डाळ द्या !

By Admin | Updated: July 19, 2016 00:18 IST2016-07-18T23:07:17+5:302016-07-19T00:18:19+5:30

हरभरा महागला : सण साजरा करण्यासाठी गरिबांची दुकानदारांना आर्जव; ८० वरून थेट १२० रुपयांवर भाव

Brother ... celebrate the festival so much! | भाऊ ...सण साजरा हुईल इतकी तरी डाळ द्या !

भाऊ ...सण साजरा हुईल इतकी तरी डाळ द्या !

सातारा : उगाचच कोणाची तरी नको इतकी स्तुती केली तर त्याला हरभऱ्याच्या झाडावर चढवणे म्हणतात... पण ऐन सणासुदीच्या तोंडावरच जर हरभरा डाळीच्या दरांनी उच्चांक गाठला तर त्याला काय म्हणायचं माहितीये...! ‘ओ भाऊ... सण साजरा हुईल इतकी तरी द्या की!बैलांचा सण म्हणून बेंदूर सर्वत्र साजरा होतो; पण काही घरांमध्ये तडजोड करून हा सण साजरा केला गेला. अवघ्या १२ दिवसांत ८० वरून १२० रुपयांवर हरभरा डाळीच्या दराने भरारी घेतल्यामुळे अनेक घरांमध्ये सन्नाटा होता. काही घरांनी तर पावशेर डाळ नेवून त्यात अवघ्या आठ ते दहा पुरण पोळ्या करून सण साजरा करण्याचा उत्साह दाखविला.
शहर व परिसरात आपापल्या कुवतीनुसार पुरण पोळीचे साहित्य आणून हा सण केला. काहींनी ओढाताण न करता अन्य गोड पदार्थ करून हा सण उत्साहाच्या वातावरणात कुटूंबियांसह साजरा केला. (प्रतिनिधी)

सणाला नाट नको म्हणून...
गेल्या काही दिवसांत किराणा मालाचे दर वाढले आहेत. ऐन सणाच्या तोंडावर हरभरा डाळीने घेतलेली उडी, त्याला भर म्हणून अलीकडे गूळ, मैदा यांच्या दरातही वाढ झाली आहे. ही दरवाढ सामान्य कष्टकऱ्यांना न परवडणारी आहे. म्हणूनच सणाला नाट लावायचा नाही म्हणून आपल्या बजेटमध्ये बसेल इतकीच खरेदी करण्यात येत आहे.

Web Title: Brother ... celebrate the festival so much!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.