ताटातुट झालेल्या माय-लेकराची घडली भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:07 IST2021-01-08T06:07:37+5:302021-01-08T06:07:37+5:30
याबाबत माहिती अशी की, पुसेसावळी येथील प्रशांत कदम हे पत्नीच्या उपचारासाठी येथील खासगी प्रयोगशाळेत आले होते. सोबत चार वर्षाचा ...

ताटातुट झालेल्या माय-लेकराची घडली भेट
याबाबत माहिती अशी की, पुसेसावळी येथील प्रशांत कदम हे पत्नीच्या उपचारासाठी येथील खासगी प्रयोगशाळेत आले होते. सोबत चार वर्षाचा मुलगा राजवीरही होता. प्रशांत कदम हे काही वेळ बाहेर गेले होते. नंबर आल्यावर त्या आत गेल्या असता राजवीर पहिल्या मजल्यावर बाहेर थांबला होता. त्या उपचार घेऊन बाहेर आल्या असता राजवीर दिसला नाही. त्या तडक खाली रस्त्यावर आल्या. तिथे त्यांच्या पतीजवळ मुलगा आहे का पाहिले तिथे पण मुलगा दिसला नाही. राजवीर बाहेर कुठे गेला, की कोणी पळवून नेले या भीतीने माउलीने फुटपाथवर धाव घेतली. तो कुठे दिसतो का म्हणून हंबरडा फोडला. बघता बघता नागरिक जमा झाले. त्यांनीही राजवीरचा शोध सुरू केला. तो मुलगा जवळ कुठे दिसून आला नाही. काही युवक व त्या मुलाचे वडील शोध घेऊ लागले, तो हरवल्याच्या पाचशे मीटर परिसरात कुठे आढळला नाही.
दरम्यान व्यावसायिक अनिल सांडगे यांना तो मुलगा कॉसमॉस बँक परिसरात सापडला. त्यांनी त्यास नाव विचारलेवर ‘तो आई पाहिजे,’ म्हणून रडू लागला. तेव्हा त्यास ते सरळ कऱ्हाड शहर पोलिसात घेऊन आले. त्यांनी राजवीर यास पोलिसांच्या स्वाधीन केले. राजवीर सापडल्याचे प्रशांत कदम यांना समजल्यावर त्यांनी कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्याची ओळख पटवून पोलिसांनी त्याला स्वाधीन केले. मुलाला आईने छातीशी कवटाळत अश्रूंना वाट करून दिली.