ब्रिटनच्या प्रिन्सला ‘कशिदा करी’ची माणदेशी भगिनीकडून भेट..
By Admin | Updated: April 15, 2016 00:43 IST2016-04-14T22:59:13+5:302016-04-15T00:43:00+5:30
नरेंद्र मोदींचे निमंत्रण : देशातील २७ मान्यवरांमध्ये चेतना सिन्हा यांचा समावेश

ब्रिटनच्या प्रिन्सला ‘कशिदा करी’ची माणदेशी भगिनीकडून भेट..
म्हसवड : ब्रिटनचे ‘ड्यूक आॅफ केंब्रिज’ प्रिन्स विल्यम आणि त्यांची पत्नीही ‘डचेस आॅफ केंब्रिज’ कँथरिन तथा केट मिडलटन हे भारत दौऱ्यावर आले होते. पंतप्रधान नरेंद्र्र मोदी यांनी प्रिन्स विल्यम व केट मिडलटन यांच्या प्रीत्यर्थ नवी दिल्ली येथे आयोजित केलेल्या शाही मेजवानीस देशातील निवडक २७ मान्यवरांना निमंत्रित केले होते. यामध्ये म्हसवडच्या माणदेशी फाऊंडेशनच्या अध्यक्षा चेतना सिन्हा यांचा समावेश होता. यावेळी सिन्हा यांनी पंतप्रधानासह परदेशी पाहुण्यांना ‘कशिदा करी’ रुमाल भेट दिला.
यावेळी नरेंद्र मोदी यांनी चेतना सिन्हा यांच्याशी चक्क गुजराथी भाषेतच संवाद साधला व सिन्हा यांच्या जुन्या आठवणीस उजाळा देत त्यांनी माणदेशी महिला बँक व माणदेशी फाऊंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्याची माहितीही घेतली. यावेळी सिन्हा यांनी नरेंद्र मोदी व या देशात आलेले पाहुणे प्रिन्स विलियन त्यांची पत्नी केट मिडलटन यांना सुंदर विणकाम केलेले ‘कशिदा करी’ हे प्रसिद्ध हातरुमाल प्रत्येकी भेट दिले व त्यांनी त्याचा आपुलकीने स्वीकारलेह
ी. (प्रतिनिधी)