शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

Satara: नवीन महाबळेश्वर प्रकल्पात सुस्पष्टता आणा - सत्यजितसिंह पाटणकर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 15:11 IST

हरकती, तक्रारी, आक्षेप अन् मागण्यासंदर्भात बैठक

पाटण : नवीन महाबळेश्वर प्रकल्प हा सार्वत्रिक हिताचा असला तरी त्यात मूळच्या स्थानिक खासगी जमीनधारकांना याचा नक्की कसा आणि किती फायदा होणार, याची स्पष्टता गरजेचे आहे. खासगी जागांवर परस्पर लावलेले आरक्षण हे अन्यायकारक असून, याबाबत शासनाने आपली भूमिका स्पष्ट करावे. कोयनेतील बंद बोटिंग, पर्यटनाची मूलभूत माध्यमे तातडीने सुरू करावीत. प्रकल्पातील जाचक अटी, नियम कमीत कमी करून नानाविध कागदपत्रे व परवानग्यांसाठी पाटण येथेच या प्रकल्पाचे कार्यालय व्हावे, अशा मागण्यांसह या प्रकल्पासंदर्भात हरकती, आक्षेप जिल्हा बँकेचे संचालक सत्यजितसिंह पाटणकर यांनी एका निवेदनाद्वारे घेतला आहे.नवीन महाबळेश्वर प्रकल्पासंदर्भात पाटण तालुक्यातील स्थानिकांच्या हरकती, तक्रारी, आक्षेप व मागण्यासंदर्भात येथे बैठक घेण्यात आली होती. सत्यजितसिंह पाटणकर यांनी बैठकीस उपस्थित राहत स्थानिक जनतेच्या मागण्या व हरकतींचे निवेदन प्रकल्पाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले.निवेदनात म्हटले आहे की, नवीन महाबळेश्वर प्रकल्पात तालुक्यातील ज्या गावांचा समावेश करण्यात आलेला आहे, त्या-त्या गावांतील खासगी जमिनीवर पर्यटनवाढीच्या अनुषंगाने शासनाने वेगवेगळ्या प्रकारचे आरक्षण टाकले आहे.

यासंदर्भात संबंधित जमीन मालकांना कोणतीही माहिती दिलेली नाही. संबंधित जमिनींच्या बदल्यात शासनाकडून नक्की कशाप्रकारे व किती मोबदला मिळणार, हेही जाहीर करावे. या जमिनींवर स्थानिक जमीन मालकांना वेगळा प्रकल्प अथवा काही गोष्टी करायच्या असतील तर त्यांचे अधिकार अबाधित ठेवावेत. त्यामुळे विनापरवाना परस्पर टाकलेले हे आरक्षण स्थानिकांना अमान्यच आहे. जे आरक्षण परस्पर टाकले आहे, ते बदलण्यासाठी करावी लागणारी प्रक्रिया याबाबतही प्रशासनाकडून सविस्तर खुलासा होणे गरजेचे आहे.

यावेळी माजी सभापती राजाभाऊ शेलार, बबनराव कांबळे, अविनाश महिंदकर, सत्यजित शेलार, शंकरराव घाडगे, अधिकराव चव्हाण आदी मान्यवर विविध गावांचे सरपंच, सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रकल्पाचे मुख्य कार्यालय पाटणमध्येच हवे..नवीन माबळेश्वर प्रकल्पात पाटण तालुक्यातील अनेक गावांचा समावेश आहे. या प्रकल्पाचे मुख्य कार्यालय हे पाटणमध्ये करण्यात यावे, जेणेकरून स्थानिकांना व उद्योजकांना पर्यटनवाढीसाठी आवश्यक त्या परवानग्या आदी बाबींसाठी सोयीस्कर होईल आणि सातारा, पुणे, मुंबईचे हेलपाटे वाचून कमी वेळात आपल्याला हा प्रकल्प लवकर व चांगल्या पद्धतीने साकार करता येईल. अशाप्रकारच्या अनेक मागण्या, हरकती व आक्षेप याचा तातडीने व गांभीर्याने विचार करून त्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना व कार्यवाही व्हावी.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थान