उज्ज्वला पुन्हा चुलीवर; कनेक्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:44 IST2021-08-17T04:44:08+5:302021-08-17T04:44:08+5:30

सिलिंडर टाकीचा दर वाढला : ग्रामीण भागात चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ (टेम्प्लेट १०४५) लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : ...

Bright again on the stove; Connection | उज्ज्वला पुन्हा चुलीवर; कनेक्शन

उज्ज्वला पुन्हा चुलीवर; कनेक्शन

सिलिंडर टाकीचा दर वाढला : ग्रामीण भागात चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ (टेम्प्लेट १०४५)

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : दारिद्ररेषेखालील व आर्थिकदृष्ट्या सक्षम नसणाऱ्या कुटुंबांसाठी उज्ज्वला गॅस योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा करण्यात आली आहे. ही योजना चांगली असली तरी गॅस सिलिंडरच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्य अडचणीत आहेत. उज्ज्वलाचे लाभार्थी मेटाकुटीला आले आहेत. त्यामुळे चुलीवर स्वयंपाक करावा लागत आहे.

मागील काही वर्षांपूर्वी केंद्र शासनाने दारिद्रयरेषेखालील कुटुंबांसाठी उज्ज्वला गॅस योजना सुरू केली. २०१८ मध्ये या योजनेचा विस्तार करण्यात आला, तर आता केंद्र शासनाने उज्ज्वला २ ची घोषणा केली आहे. पूर्णपणे मोफत गॅस कनेक्शन मिळणार आहे. असे असले तरी सिलिंडर टाकीचा दर वाढतच चालला आहे. त्यामुळे गरिबांचा खर्च आणखी वाढतच जाणार आहे. कारण, मागील काही महिन्यांपासून सिलिंडर टाकीचा दर पाहता सामान्यांना आणखी खर्च करणे अवघडच होणार आहे.

..................................

गॅस सिलिंडरचे दर (रुपयात)

जानेवारी २०१९ ५६०

जानेवारी २०२० ६५०

जानेवारी २०२१ ६९९

ऑगस्ट २०२१ ८४०

................................................

सिलिंडर भरणे कसे परवडणार...

योजना सुरू होण्यापूर्वी आम्ही स्वयंपाकासाठी चुलीचाच वापर करत होतो. मात्र, माहिती मिळाल्यानंतर गॅसचे कनेक्शन घेतले. आता सिलिंडर टाकीचे दर वाढत चालले आहेत. त्यामुळे आमच्यासारख्या सामान्य कुटुंबाचा खर्च वाढत आहे. त्यामुळे चुलीवर अधिककरून स्वयंपाक केला जातो.

- रुक्मिणी पवार, गृहिणी.

.......................................

मागील १५ वर्षांपासून गॅसचा वापर करत आहोत. मात्र, आता गॅस कनेक्शन मोफत मिळूनही नंतर सिलिंडर टाकी घेणे परवडणारे नाही. त्यामुळे चुलीवरच स्वयंपाक केला जातोय. कारण, ग्रामीण भागात कोठेही काटयाकुट्या, जळण मिळते. त्यामुळे गॅसवरच्या स्वयंपाकाला सध्यातरी बाजूला ठेवले आहे.

- राधा काळे, गृहिणी.

...................................................

कोरोनामुळे कामे मिळवताना अडचणी येत आहेत. त्यातच इतर वस्तू, साहित्यांचे भाव वाढलेले आहेत. त्याचबरोबर गॅस सिलिंडर टाकीचे दरही सतत वाढत चालले आहेत. आता ८५० रुपये टाकीला द्यावे लागतात. दर महिन्याला टाकी लागते. त्यामुळे चुलीवरच स्वयंपाक करावा लागत आहे.

- रमा पाटील, गृहिणी.

......................................................

Web Title: Bright again on the stove; Connection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.