नववधू आली बैलगाडीतून... व-हाड निघालंय लग्नाला-: कोपर्डे हवेलीत अनोखा सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 12:42 AM2019-07-24T00:42:46+5:302019-07-24T00:46:06+5:30

पूर्वी लग्नस्थळी पोहोचण्यासाठी लग्न मालक व-हाडासाठी बैलगाडीचा वापर करत होते. बदलत्या काळात वेळेची बचत करण्यासाठी वाहनांचा वापर होऊ लागला, त्यामुळे बैलगाडीतून व-हाड घेऊन जाणे दुर्मीळ झाले.

The bride came from the bullock cart and the 3 bones were gone | नववधू आली बैलगाडीतून... व-हाड निघालंय लग्नाला-: कोपर्डे हवेलीत अनोखा सोहळा

कोपर्डे हवेली, ता. क-हाड येथील व-हाड मंगळवारी बैलगाडीतून विवाहस्थळी गेले. यावेळी नवरीने कासरा हातात घेतला होता.

googlenewsNext
ठळक मुद्देवधूसह वºहाडीही सजविलेल्या गाडीतून विवाह मंडपात

कोपर्डे हवेली : बदलत्या काळानुसार गत तीस ते चाळीस वर्षांपासून अनेक बदल लग्न सोहळ्यात झाल्याचे दिसून येत आहेत. काही वर्षांपूर्वी लग्न सोहळ्याला  व-हाड घेऊन जाण्यासाठी बैलगाडीचा वापर केला जायचा; पण बदलत्या काळात जुन्या गोष्टी लुप्त झाल्या. मात्र, जुन्या गोष्टींना उजाळा देण्यासाठी कोपर्डे हवेली येथे मंगळवारी एका युवतीच्या विवाहात वºहाडासाठी चक्क बैलगाड्या सजविण्यात आल्या. या बैलगाडीतूनच  व-हाड लग्न मंडपात पोहोचले.

पूर्वी लग्नस्थळी पोहोचण्यासाठी लग्न मालक वºहाडासाठी बैलगाडीचा वापर करत होते. बदलत्या काळात वेळेची बचत करण्यासाठी वाहनांचा वापर होऊ लागला, त्यामुळे बैलगाडीतून वºहाड घेऊन जाणे दुर्मीळ झाले. त्यातच गावात बैलांची संख्याही हाताच्या बोटावर मोजण्याइतपत राहिली आहे. त्यामुळे बैलगाडी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. अशातच मंगळवारी कोपर्डे हवेली येथील कोयना दूध संघाचे संचालक सुदाम चव्हाण यांची कन्या पल्लवी व विंग येथील महादेव खबाले-पाटील यांचे चिरंजीव प्रमोद यांच्या विवाहासाठी बैलगाड्यांचा वापर करण्यात आला. हा विवाह धुरूंग मळा येथील एका कार्यालयात संपन्न झाला.

कोपर्डे हवेली ते धुरूंग मळा हे अंतर दोन किलोमीटर आहे. कोपर्डे गावातून सजवलेल्या बैलगाडीतून वधू आणि वºहाड लग्नस्थळी दाखल झाले. यावेळी बैलांना झुली घालून गळ्यात चाळ घातले होते. शिंगाला शेंब्यासह रंग दिला होता.


ग्रामस्थांत कुतूहल
गत काही वर्षांपासून बेंदूर सणाला बैलाऐवजी शेती अवजार म्हणून ट्रॅक्टरची मिरवणूक काढून सण साजरा केला जातो. यावर्षी पेरले येथे शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरची मिरवणूक काढून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याचीच पुनरावृत्ती कोपर्डे हवेली येथे बैलगाडीतून गेलेल्या वºहाडी मंडळींनी केली.

नववधूच्या हातात कासरा
वराला, वधूला लग्नस्थळी घेऊन जाण्यासाठी मोठ-मोठ्या अलिशान गाड्या, घोडे यांचा वापर केला जातो; पण या लग्नामध्ये वधू बैलगाडीतून दाखल झाली. एवढेच नव्हे तर कासरा हातात घेऊन उभी राहिलेली वधू यावेळी कौतुकाचा विषय ठरली.


 

Web Title: The bride came from the bullock cart and the 3 bones were gone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.