कोल्हापूर नाक्याने घेतला मोकळा श्वास

By Admin | Updated: November 11, 2014 23:18 IST2014-11-11T22:02:40+5:302014-11-11T23:18:54+5:30

एस़ टी़ चालकास दंड : महामार्गावर प्रवासी घेण्यास बंदी

The breathing exercises taken by the Kolhapur naka | कोल्हापूर नाक्याने घेतला मोकळा श्वास

कोल्हापूर नाक्याने घेतला मोकळा श्वास

मलकापूर : कोल्हापूर नाक्यावर वारंवार होत असलेली वाहतूकीची कोंडी विचारात घेता महामार्गावर वाहने थांबवून प्रवासी घेण्यास मज्जाव करण्यात आला आहे़ पोलिसांच्यावतीने एस़ टी़ चालकावरही दंडात्मक करवाई करण्यात आली़ आल्याने प्रवासी वाहतुकदार चांगलेच धास्तावले आहेत. एस़ टी़ व पोलिसांंचे प्रत्येकी दोन कर्मचारी येथे थांबून राहत असल्याने कोल्हापूर नाक्याने मोकळा श्वास घेतला आहे़
येथील कोल्हापूर नाका परिसरात प्रवासी वाहतूक करणाऱ्या खाजगी बसेसने नेहमीच अतिक्रमण केलेले असायचे. उपमार्गासह महामार्गावर अस्ताव्यस्त बस उभ्या करून प्रवासी भरत असल्यामुळे वारंवार वाहतूकीची कोंडी होत होती़ त्यातच भरितभर म्हणून चारचाकी गाड्याही याठिकाणी प्रवासी घेण्यासाठी उभ्या राहत़ एस़ टी़ बसेस तर महामार्गावरच ठिय्या मांडून असायच्या. त्यामुळे या परिसरात दिवसभरातून अनेकवेळा वाहतूकीच्या कोंडीला सामोरे जावे लागत होते़ वारंवार होणारी वाहतूकीची कोंडी विचारात घेता एस़ टी़ आगार व कऱ्हाड शहर वाहतूक पोलिसांच्यावतीने विशेष मोहिम राबविण्यात येत आहे़ खासगी प्रवासी वाहतूक करणारी वाहने पुढे शंभू महादेवाच्या मंदिराकडे उभी केली जात आहेत़ एस़ टी़ च्या दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून सातारा बाजूला जाणाऱ्या प्रत्येक एस़ टी़ ला उपमार्गावरच उभे करून प्रवासी चढ-उतार करण्यास सुरूवात केली आहे़ तर खाजगी वाहनांवर कारवाई करण्यासाठी दोन पोलिस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे़
चार दिवसांपुर्वी पोलिसांनी एस़ टी़ चालकावर दंडात्मक कारवाई करून १०० रूपये दंड वसूल केला़ या मोहिमेमुळे दोन दिवसात कोल्हापूर नाक्यावर वाहतूकीची कोंडी होण्याचे प्रमाण कमी झाले आहे़ (प्रतिनिधी)


रोटेशनप्रमाणे चार कर्मचारी
एस़ टी़ बसेस महामार्गावर उभ्या राहु नयेत, म्हणून आगराच्यावतीने रोटेशनप्रमाणे दोन-दोन असे चार कर्मचारी तर वाहतूकीची जबाबदारी असणाऱ्या कऱ्हाड शहर वाहतूक पोलिसांच्या वतीनेही रात्री दहा वाजेपर्यंत चार कर्मचारी कायमस्वरूपी या ठिकाणी नेमण्यात आले आहेत.

वाहने सुसाट
कोल्हापूर नाका परिसरात महामार्गाच्या कोल्हापूर-सातारा लेनला उड्डाणपूल नाही़ वारंवार वाहतूकीची कोंडी होत असल्यामुळे वेगावर मर्यादा येत होती़ महामार्ग मोकळा झाल्यामुळे सध्या महामार्गावरून जाणारी वाहने सुसाट वेगाने जात आहेत़ याठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जीव मुठीत धरून काम करावे लागत आहे़


कोल्हापूर नाक्यावर होणारी वाहतूकीची कोेंडी टाळण्यासाठी कर्मचारी नेमून उपाययोजना केली आहे़ त्यामुळे फक्त वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल. मात्र या परिसरात सुसाट वेगामुळे अपघातांची संख्या वाढणार आहे़ कोल्हापूर नाक्यावरील वाहतूकीचा कायमस्वरूपी प्रश्न मिटविण्यासाठी कोल्हापूर-सातारा लेनवर उड्डाण पुलाची गरज आहे़
- राजेंद्र यादव
बांधकाम सभापती, मलकापूर

Web Title: The breathing exercises taken by the Kolhapur naka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.