उमेदवारांमध्ये चढाओढ; निवडणूक अधिकारी घामाघूम!

By Admin | Updated: April 9, 2015 00:05 IST2015-04-08T22:46:53+5:302015-04-09T00:05:28+5:30

शेवटचा दिवस : रामराजे, उदयनराजे, शिवेंद्रसिंहराजे, दादाराजेंसह ८८ उमेदवारांचे अर्ज दाखल--सांगा डीसीसी कोणाची ?

Brawl among candidates; Election Officer Ghamaghoom! | उमेदवारांमध्ये चढाओढ; निवडणूक अधिकारी घामाघूम!

उमेदवारांमध्ये चढाओढ; निवडणूक अधिकारी घामाघूम!

सातारा : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी अभूतपूर्व गर्दीत बुधवारी दिग्गज उमेदवारांचे अर्ज दाखल झाले. विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे, दादाराजे खर्डेकर यांच्यासह ८८ उमेदवारांनी बुधवारी अर्ज दाखल झाले. ही निवडणूक अनेकांसाठी प्रतिष्ठेची ठरणार असल्याने अर्ज भरताना कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्रकुमार दराडे यांना अनेकवेळा उमेदवार किंवा सूचक वगळता इतरांनी कार्यालयाच्या बाहेर जाण्याच्या सूचना कराव्या लागल्या.बुधवारी सोसायटी मतदारसंघ सातारा तालुक्यातून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, बाबासो घोरपडे, कऱ्हाड तालुक्यातून माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर, वसंतराव जगदाळे, कोरेगावातून लालासाहेब शिंदे, कांतिलाल पाटील, राहुल कदम, भगवानराव जाधव, सुनील खत्री, खटावमधून सत्यवान कांबळे, संतोष पवार, माणमधून जयकुमार गोरे, युवराज बनगर, सदाशिव पोळ, संजय जगताप, खंडाळ्यातून किशोर साळुंखे, दत्तात्रय ढमाळ, शामराव गाढवे, नितीन भरगुडे-पाटील, अनंत तांबे, राजेंद्र नेवसे, शंकरराव पवार, राजेंद्र कदम, अजय धायगुडे-पाटील, वाईतून नितीन लक्ष्मणराव पाटील, रतन शिंदे, दिनकर शिंदे, दादासो गायकवाड, फलटणमधून रामराजे नाईक-निंबाळकर, तुकाराम शिंदे यांचे अर्ज दाखल झाले. महिला राखीवमधून मंगल पवार, अनुपमा शाहूराज फाळके, रेखा पाटील, सुरेखा पाटील, जयश्री कदम, विजयाताई पाटील, कौसल्या पवार, रंजना साळुंखे, वैशाली फडतरे, सुनेत्रा शिंदे, शशिकला देशमुख, आशालता कदम, विमल सुतार, कुसूम मोहिते, शारदादेवी कदम, प्रभावती धुमाळ यांनी अर्ज दाखल केले.
अनुसूचित जाती-जमातीमधून प्रकाश बडेकर, बाळासाहेब शिरसाट, सत्यवान कांबळे. इतर मागास प्रवर्गातून शिवाजी भोसले, सुरेश टिळेकर, मुंबई मार्केट कमिटीचे माजी सभापती डॉ. विजयराव बोरावके, शेखर गोरे, राजेंद्र नेवसे, दीपक झेंडे, रंजना रावत, अरुण गोरे. भटक्या जमातीमधून विजय चौगुले, जोतिराम अवकिरकर, दत्तात्रय पवार, आनंदराव शेळके-पाटील, अजय धायगुडे-पाटील, अर्जुन काळे, तुकाराम शिंदे. खरेदीविक्री संघातून लक्ष्मणराव पाटील, रवींद्र कदम, विश्वासराव निंबाळकर. कृषी उत्पन्नमधून रवींद्र कदम, राजू भोसले, दादाराजे खर्डेकर, शामराव पाटील. नागरी बँका व पतसंस्थामधून सुनील पोळ, शिवाजी भोसले, विनोद कुलकर्णी, आनंदराव जुनघरे, सुनील खत्री, प्रभाकर साबळे.
गृहनिर्माणमधून खासदार उदयनराजे भोसले, ज्ञानेश्वर पवार. औद्योगिक मधून हणमंत गायकवाड, अनिल देसाई, चंद्रकांत जाधव, सुनील वाघ, नितीन राजेशिर्के, अजय धायगुडे-पाटील यांनी अर्ज दाखल केले. (प्रतिनिधी)

सुचकाकरवी रामराजेंचा अर्ज
खासदार उदयनराजे भोसले यांना जिल्हा मध्यवर्तीत येऊ न देण्याची गर्जना करणारे रामराजे नाईक-निंंबाळकर बँकेच्या निवडणुकीसाठी स्वत: अर्ज दाखल करतील, अशी शक्यता होती. मात्र, त्यांनी सुचकाकरवी बुधवारी ४ अर्ज दाखल केले. याबाबत बँकेत जमलेल्या कार्यकर्त्यांमध्ये उलट-सुलट चर्चा सुरू झाली होती; पण अधिवेशनामुळे रामराजे येऊ शकले नाहीत, असे स्पष्टीकरण एका कार्यकर्त्याने केले.

छाननीसाठी केवळ उमेदवार...
दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी गुरुवारी सकाळी ११ वाजता बँकेतील यशवंतराव चव्हाण सभागृहात होणार असून, यावेळी केवळ उमेदवार व सूचक यांच्याव्यतिरिक्त कुणालाही प्रवेश देण्यात येणार नसल्याचे स्पष्टीकरण निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्रकुमार दराडे यांनी दिली.
बँकेचे संस्थापक असणारे दिवंगत किसन वीर यांच्या कुटुंबातील सदस्यांनी या निवडणुकीत सहभाग घेतला नाही. मागील निवडणुकीत सुरेश वीर यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर प्रथमच वीर घराण्याची संचालक पदाची परंपरा खंडित झाली आहे.
अर्ज भरण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयाला मोठा गराडा होता. कार्यकर्ते जागा मिळेल त्या ठिकाणी बसत होते. यावेळी महिलांना जागा न मिळाल्याने त्यांनी बँकेच्या पायऱ्यांवरच ठिय्या घातला.

Web Title: Brawl among candidates; Election Officer Ghamaghoom!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.