नटण्यातील मुलींची मक्तेदारी मुलांनी काढली मोडून

By Admin | Updated: July 13, 2014 22:28 IST2014-07-13T22:28:26+5:302014-07-13T22:28:43+5:30

‘स्टाइल’ डोक्यावर स्वार : सुंदर दिसण्यासाठी तरुणही करू लागले पार्लरच्या वाऱ्या; ‘फंकी लूक’साठी कायपण

The boys of matrimony are forced to break the monopoly | नटण्यातील मुलींची मक्तेदारी मुलांनी काढली मोडून

नटण्यातील मुलींची मक्तेदारी मुलांनी काढली मोडून

प्रगती जाधव-पाटील ल्ल सातारा
नटणं-मुरडणं ही आता केवळ तरूणींची मक्तेदारी राहिलेली नाही. दर महिन्याला ‘फंकी लूक’ देण्यासाठी तरूणही पार्लरची वारी करू लागलेत. तोच-तोच चेहरा बघून बोअर होतो म्हणून हेअर स्टाईल बदलणारे अनेक तरूण आता पावलोपावली दिसू लागले आहेत.
आरशासमोर बसून तासन्तास आपलं रूप न्याहळत बसणारी आता केवळ स्त्री आहे असे नाही. आपल्य दिसण्याविषयीची काळजी आता मुलींइतकीच मुलंही घेऊ लागली आहेत.
तरूण सर्वाधिक वेळ आपल्या केश रचनेवर खर्च करतात, असे दिसते. कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त वेगळा ‘लूक’ त्यांना बदलत्या केशरचनेमुळे मिळतो. त्याबरोबरच आपल्या आवडीच्या व्यक्तीचे रूप काही दिवस सोबत मिरविण्याची त्यांना संधी मिळते. साताऱ्यसारख्या निमशहरी भागात अलीकडच्या काही काळात मुलं केशरचनेविषयी अधिक सजग होऊ लागली आहेत. त्यामुळे मुलींप्रमणेच आता मुलेही सणाला, वाढदिवसाला किंवा अन्य कोणत्याही कार्यक्रमांना आपल्या केशरचनेविषयी जागरूक आहेत. इतरांपेक्षा हटके ‘लूक’ दिसण्यसाठी आता तरूणांमध्येही चांगलीच चुरस लागली आहे. विशेष म्हणजे पूर्वीसारखं ‘आओ जाओ घर तुम्हारा’ अशी अवस्था आता मेन्स पार्लरमध्ये नाही. ‘अपॉइंटमेंट’ आता आवश्यक बनली आहे.
पअसे असतात बारकावे
कोणतीही हेअर स्टाईल चांगली करायची असेल तर केसांची तीक्ष्णता, अंत्यरूपण महत्त्वाचे असते. ज्याला या दोन गोष्टी सांभाळता येतात तो उत्कृष्ट केशरचना करू शकतो. केशरचनेच्या माध्यमातून चेहऱ्याचा ‘लूक’ बदलला जातो. यासाठी सरावही आवश्यक आहे. चेहरा आणि केसांची रचना बघून केलेली केशरचना चिरकाल दिसते व स्मरणातही राहते. प्रत्येकाच्या केसांची ठेवण वेगवेगळी असते. चेहऱ्याला शोभेल अशी केसांची रचना केली की ती आकर्षक दिसते हा अभ्यास महत्त्वाचा असतो.
ंचवीस दिपालकांचा रोष...
ज्या केशरचनेला तरूण ‘स्टाईल’ म्हणतात, ती केश रचना पालकांना ‘अवतार’ वाटते. म्हणूनच कोणतीही केशरचना करून घरी गेलेल्या तरूणांना पालकांच्या शाब्दिक वर्षावात चिंब व्हावे लागते. आई त्यातल्या त्यात मऊ बोलते; पण वडील म्हणजे अगदी सगळा उध्दार करतात, असे तरूण सांगतात. त्यामुळे केशररचना करून आले की खाली मान घालून सगळं ऐकायचं, अजिबात पत्युत्तर द्यायचं नाही हा ठेका तरूणांनी ठेवला आहे. या दरम्यान अगदी राग आलाच तर ‘जाऊ दे त्यांना करता येत नाही म्हणून आपल्यावर जळतात,’ असे म्हणत बोचऱ्या शब्दांचे घाव ही पोरं फुलासारखी झेलून मार्गस्थ होतात.
वसांनी बदल!
मुलांचे केस वाढायला किंवा त्यांनी केलेल्या हेअर स्टाईलचा लूक साधारणपणे पंचवीस दिवस टिकतो. त्यानंतर केस कापणे आवश्यक बनते. शहरातील काही मुलं तर दर पंचवीस दिवसांनी आपल्या केसांवर असे नवनवीन प्रयोग करत असतात. ज्या सेलिब्रिटीचा हेअर कट आवडेल त्याची इमेज डाऊनलोड करून पार्लरमध्ये नेले की तशी हेअरस्टाईल करून मिळते.
हेअर कटचे प्रकार
१ इमू जेन्टस् ही हेअर स्टाईल प्रामुख्याने नृत्यकलेशी संबंधित मुलं आणि फुटबॉल खेळाडूंना आकर्षित करणारी आहे.
२लिबर्टी स्पाईक कट या हेअर कटला मॉडेल्स आणि डान्सर विशेष प्राधान्य देतात. फंकी लूक असल्यामुळे हा कट त्यांना अधिक उठून दिसतो.
३ ड्रॅग्न स्पाईक कट याला टॅटू काढणारे कलाकार, ग्लॅमर जगतात असणारे पडद्यामागचे कर्मचारी याला प्राधान्य देतात.
४ ग्रास स्पाईक कटला शाळकरी मुलं प्राधान्य देतात. शाळेतील नियमात बसून स्टाईल करण्याचा हा कट आहे.

Web Title: The boys of matrimony are forced to break the monopoly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.