शहरं
Join us  
Trending Stories
1
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
2
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
3
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
4
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
5
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
6
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
7
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
8
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
9
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
10
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
11
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
12
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
13
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...
14
"IPL सोडायला लावलं, डिप्रेशनमध्ये होतो, ढसाढसा रडलो.."; ख्रिस गेल प्रितीच्या संघावर बरसला
15
विजेच्या धक्क्याने गमावले हात, हिंमत हारला नाही; आता करतो फूड डिलिव्हरी अन् रात्री कॅलिग्राफी
16
जाळपोळ, तोडफोडीसह नेपाळ पेटलं! हजारो युवक रस्त्यावर उतरले; आतापर्यंत १४ मृत्यू ८० हून अधिक जखमी
17
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात ४ ग्रहांचे गोचर ७ राशींना लाभ; धनलाभाची पुरेपूर संधी, नशिबाचीही साथ
18
VIDEO: क्लासिक!! धोनीने रांचीच्या रस्त्यावर चालवली व्हिंटेज आलिशान 'रॉल्स-रॉयस'; चाहते खुश
19
हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील जेवणावरचा GST दरात कपात! १ लाखाचे पॅकेज मिळणार ८०,००० हजारात
20
रॉकेट बनला 'हा' शेअर, रणबीर कपूर-दामानींसह अनेक दिग्गजांची खरेदी

टंचाईतही अरबवाडी तलावातून बेसुमार पाणीउपसा

By admin | Updated: February 29, 2016 00:59 IST

वीजपुरवठा खंडीत करावा : महावितरणच्या मदतीने परवानाधारक शेतकऱ्यांची मनमानी

वाठार स्टेशन : कोरेगाव तालुक्याच्या उत्तर दुष्काळी भागातील नांदवळ धरणातील बेसुमार पाणी उपशानंतर आता याच परिसरातील अरबवाडी पाझर तलावातूनही परवानाधारक शेतकरी मोठ्या प्रमाणात शेतीसाठी पाणीउपसा करत आहेत. यामुळे गावावर पाण्याचे मोठे संकट निर्माण होणार आहे. प्रशासनाने पाणी उपशावर बंदी घालून महावितरणने या शेतकऱ्यांच्या मोटारींची वीजजोडणी खंडीत करावी, अशी मागणी अरबवाडी ग्रामपंचायतीने जिल्हाधिकाऱ्याकडे केली आहे.कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील जवळपास ४७ गावातील शेती व माणसांची तहान भागवणाऱ्या तळहिरा, अरबवाडी व नांदवळ या तीन धरणात अत्यल्प पाणीसाठा आहे. सध्या दुष्काळाचे सावट या भागात दिसत आहे. अनेक गावांत पाणीटंचाई जाणवत आहे. असे असतानाही या धरणातून पाणी उपशाला परवानगी दिली गेल्याने शासनाबाबत नाराजी व्यक्त होत आहे.अरबवाडी पाझर तलावात सध्या अत्यल्प पाणी शिल्लक आहे. या धरणातून शेतीसाठी पाणीउपसा करण्याचा अनेक शेतकऱ्यांकडे परवाने आहेत, मात्र सध्याच्या भीषण दुष्काळी परिस्थितीत या धरणातील पाणी उपसा झाल्यास आगामी ४ ते ५ महिन्यांच्या दुष्काळात लोकांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होईल. याशिवाय जनावरांच्या पाण्याचाही मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. यासाठी आतापासूनच असलेले पाणी शिल्लक राहावे, अशी मागणी अरबवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच व पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे दिली आहे यासाठी महावितरणला जबाबदार धरुन प्रशासनाने या ठिकाणी सुरु असलेल्या वीजपंपांचा वीजपुरवठा खंडित करावा, अशी प्रमुख मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. (वार्ताहर)अरबवाडी, बनवडी, दुधनवाडी या गावांसाठी दुष्काळात आधार असलेल्या अरबवाडी धरणातून सध्या सुरु असलेल्या पाणीउपशाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देऊन उपसाबंदी बंद करावी. - तानाजीराव गोळे, चेअरमन, अरबवाडी सोसायटी