शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

मागवला मोबाईल अन् हातात पडला बूट, नामांकित वस्तू स्वस्तात देत असल्याचे आमिष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 16:05 IST

काही दिवसांपूर्वी मोबाईलवर एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला. समोरून नामांकित कंपनीचा मोबाईल केवळ चार हजार रुपयांत मिळत असल्याचे सांगण्यात आले. या कॉलवर विश्वास ठेवून युवकाने लगेचच मोबाईलही बुक केला. काही दिवसांतच टपाल कार्यालयात त्याच्या नावाचे पार्सल आले.

ठळक मुद्देमागवला मोबाईल अन् हातात पडला बूटनामांकित वस्तू स्वस्तात देत असल्याचे आमिषऔंध परिसरात अनेकांची मोबाईल कॉलद्वारे फसवणूक

औंध : काही दिवसांपूर्वी मोबाईलवर एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला. समोरून नामांकित कंपनीचा मोबाईल केवळ चार हजार रुपयांत मिळत असल्याचे सांगण्यात आले. या कॉलवर विश्वास ठेवून युवकाने लगेचच मोबाईलही बुक केला. काही दिवसांतच टपाल कार्यालयात त्याच्या नावाचे पार्सल आले.

चार हजार रुपये भरून त्याने पार्सल ताब्यात घेतले अन् सत्य उघडकीस आले. त्या पार्सलमधून मोबाईलऐवजी चक्क शंभर-दोनशे रुपये किमतीचे बूट त्याच्या हाती पडले. खटाव तालुक्यातील औंध परिसरातील अनेक युवकांची अशा प्रकारच्या फसव्या कॉलने फसवणूक होत आहे.

औंध परिसरातील नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून अशा प्रकारचे कॉल येऊ लागले आहेत. कॉल आल्यानंतर हॅलो... नमस्कार... आपल्या मोबाईल नंबरची ही वस्तू घेण्यासाठी निवड झाली आहे. ही वस्तू एवढ्या किमतीची असून, आपणास ती कमी किमतीत मिळत आहे. बाजारभावापेक्षा आपले एवढे पैसे बचत होत आहेत, असेसांगून नागरिकांची दिशाभूल केली जात आहे.औंध येथील एका युवकाला अशाच एका प्रसंगाला सामोरे जावे लागले. या युवकाला निनावी नंबरवरून आलेल्या फोनद्वारे नामांकित कंपनीच्या मोबाईलचे आमिष दाखविण्यात आले. पंधरा हजार रुपये किमतीचा मोबाईल केवळ चार हजार रुपयांना मिळत असल्याचे त्याचे सांगण्यात आल्याने त्या फोनवर विश्वास ठेवला.

नाव व पत्ता सांगितल्यानंतर काही दिवसांतच गावातील टपाल कार्यालयात त्या युवकाच्या नावाचे पार्सल आले. ही माहिती मिळताच त्याने आनंदाच्या भरात टपाल कार्यालय गाठले आणि चार हजार रुपये भरून आलेले पार्सल आपल्या ताब्यात घेतले.घरी आल्यानंतर त्याने पार्सल उघडून पाहिले असता त्याचा मोठा धक्काच बसला. पार्सलमध्ये मोबाईल ऐवजी शंभर-दोनशे रुपये किमतीचे बूट त्याच्या हाती पडले. आपली फसवणूक झाल्याचे युवकाच्या लक्षात आले. मात्र, घरच्यांच्याभीतीमुळे त्याने ही गोष्ट कोणालाही सांगितली नाही.

अशा प्रकारच्या आणखी घटना औंध परिसरात घडल्या आहेत. परंतु बदनामीमुळे कोणीही याची वाच्यता केली नाही. नागरिकांनी अशा फसव्या फोन कॉल वरून सावध राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाSatara areaसातारा परिसर