वडगावमध्ये आले दोन्ही गोरे गट एकत्र!

By Admin | Updated: August 27, 2015 21:47 IST2015-08-27T21:47:56+5:302015-08-27T21:47:56+5:30

सरपंच निवड : भाजपाला डावलले; नव्या राजकारणाची नांदी

Both white groups come together in Wadgaon! | वडगावमध्ये आले दोन्ही गोरे गट एकत्र!

वडगावमध्ये आले दोन्ही गोरे गट एकत्र!

दहिवडी : माण तालुक्यातील वडगाव येथील सरपंच, उपसरपंच निवडीत आमदार जयकुमार गोरे व त्यांचे बंधू पंचायत समिती सदस्य शेखर गोरे यांचे गट एकत्र आले. यावेळी भाजपाला डावलण्यात आले. या एकत्रीकरणाची सर्वत्र चर्चा सुरू आहे.
वडगाव हे माण तालुक्यातील राजकीयदृष्ट्या अत्यंत जागृत समजले जाणारे गाव आहे. प्रत्येक निवडणूक ही अटीतटीची होत असते. भाजपप्रणित वडगाव विकास आघाडीचे ९ उमेदवार उभे केले. या गावात आमदार जयकुमार गोरे व शेखर गोरे यांचेही गट आहेत. त्यामुळे तिरंगी लढत होईल किंवा राज्य पातळीवरील विचार करता भाजप व राष्ट्रीय समाज पक्ष एकत्र येईल, असे वाटले होते.
परंतु संपूर्ण तालुका दोन्ही गोरे बंधूंनी ढवळून काढला असताना याठिकाणी चक्क एकत्र निवडणुका लढविताना दिसले. आमदार गोरे समर्थकांनी ९ पैकी ५ तर शेखर गोरे समर्थकांनी ४ जागा लढविल्या. त्यामुळे याठिकाणी भाजप विरोधात काँग्रेस व रासप असे समीकरण झाले. त्यामध्ये भाजप ३ काँग्रेस ३ व रासप ३ अशा जागा निवडून आल्या. त्यामुळे आता काँग्रेसला बाजूला ठेवून भाजप-रासप युती होईल, असे वाटले; परंतु घडले उलटे. तालुक्यात एकमेकाच्या नावाने टीका करणारे दोन्ही भाऊ वडगाव ग्रामपंचायतीत मात्र एकत्र आले. तालुक्याला अपेक्षित नसतानाही भाजपवाल्यांना विरोधात बसावे
लागले.
जयकुमार गोरे मोठे बंधू असल्याने त्यांच्या पार्टीच्या नीलिमा अवघडे सरपंचपदी तर शेखर गोरे पॅनेलमध्ये नितीन ओंबासे उपसरपंचपदी निवडून आले. संपूर्ण तालुक्यात दोन्ही भावांचीच सत्ता, असे समीकरण तयार झाले.

युतीचा राजकारणावर होणार परिणाम?
भविष्यातही या युतीचे राजकीय परिणाम होऊ शकतात. बाजार समितीतही दोघांचे समान बलाबल असल्याने ही सत्ताही आपापसात वाटून घेतली जाणार का? याकडे राजकीय जाणकारांचे लक्ष लागले आहे.
आम्ही स्थानिक पातळीवर जय मल्हार परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून लढलो आहे. सरपंच हे आमदार गोरे व मी शेखर गोरे समर्थक आहे. आम्ही गावच्या विकासासाठी भाजप विरोधात एकत्र आलो आहे.
- नितीन आेंबासे, उपसरपंच

Web Title: Both white groups come together in Wadgaon!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.