तलवार हल्ल्यात दोघे अत्यवस्थ

By Admin | Updated: June 12, 2014 00:43 IST2014-06-12T00:40:13+5:302014-06-12T00:43:52+5:30

सैदापूरमध्ये तणाव : भ्रष्टाचार उघड केल्यामुळे हल्ला

Both of them are in dire straits | तलवार हल्ल्यात दोघे अत्यवस्थ

तलवार हल्ल्यात दोघे अत्यवस्थ

सातारा : भ्रष्टाचार उघड केल्याचा राग मनात ठेवून सैदापूर फाट्यावर काहीजणांनी नंग्या तलवारी नाचवत दोन युवकांवर हल्ला केला. यामध्ये संबंधित युवक गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकारामुळे सैदापूर येथे प्रचंड तणाव निर्माण झाला.
राहुल शिवाजी पवार (वय २३, रा. सैदापूर) हा सैदापूर येथीलच एका वेल्डिंग वर्कशॉपमध्ये काम करतो. आज, बुधवारी दुपारी अचानक चार ते पाच युवक त्याच्या दुकानात घुसले आणि त्याला बेदम मारहाण केली. त्यामध्ये राहुल जखमी झाला. त्याला रुग्णालयात नेण्यात आले. परंतु या प्रकाराची माहिती त्याच्या मित्रांना समजली. पोलीस घटनास्थळी पंचनामा करण्यासाठी येणार होते.
त्यामुळे राहुलचे मित्रही तेथेच थांबले होते. १५ ते २० युवक नंग्या तलवारी नाचवत तेथे आले. तेथे थांबलेल्या प्रवीण अंकुश पवार आणि शिवाजी पवार या दोन युवकांवर त्यांनी तलवारीने वार केले. त्यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ शहरातील खासगी दवाखान्यात नेण्यात आले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले.
या प्रकरणी कैलास काळे, अमोेल काळे, अरुण घाडगे, सुधीर जाधव, अनिल जाधव, किरण कुऱ्हाडे, मनोज घाडगे यांच्यावर खुनाचा प्रयत्न, गर्दीङ्कजमविणे, मारामारी या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘राष्ट्रीय पेयजल योजनेत झालेला भ्रष्टाचार प्रवीण पवार याने उघडकीस आणला होता. या पार्श्वभूमीवर संबंधितांवर कारवाई होणार होती. या प्रकारातून आजचा हल्ला झाला,’ असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस निरीक्षक विष्णू पवार अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Both of them are in dire straits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.