शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनंतर भारतीय सैन्य अॅक्टीव्ह, जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तराला सुरुवात
4
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
6
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
7
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
8
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
9
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
10
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
11
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
12
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
13
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
14
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
15
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
16
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
17
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
18
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
19
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
20
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

दोन्ही राजेंची बैठक झाली; पण आम्ही नाय पाहिली- खासदार-आमदारांची एकत्र गुफ्तगू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 00:46 IST

प्रगती जाधव-पाटील । सातारा : मनोमिलनाचं रोपटं पुन्हा एकदा कार्यकर्त्यांच्या मनात रुजविण्यासाठी योग्य वेळेच्या प्रतीक्षेत असणाऱ्या आमदार-खासदार यांची गोपनीय ...

ठळक मुद्देगोपनीयता पाळण्याचा प्रयत्न : मोजक्या कार्यकर्त्यांसोबत साताऱ्यात बैठक

प्रगती जाधव-पाटील ।सातारा : मनोमिलनाचं रोपटं पुन्हा एकदा कार्यकर्त्यांच्या मनात रुजविण्यासाठी योग्य वेळेच्या प्रतीक्षेत असणाऱ्या आमदार-खासदार यांची गोपनीय बैठक साताऱ्यात झाली. या बैठकीतील चर्चा माध्यमांपर्यंत पोहोचलीही; पण याविषयी आमदार गटाने तोंडावर बोट ठेवले आहे. त्यामुळे दोन्ही राजेंची बैठक झाली; पण आम्ही नाही पाहिली, असे चित्र निर्माण केले जात आहे.

सातारा पालिका निवडणुकांच्या निमित्ताने दीड दशकांपूर्वी राजघराण्यातीलज्येष्ठांच्या पुढाकाराने झालेल्या मनोमिलनाला गत निवडणुकीत उभा तडा गेला. या निवडणुकीत तरबेज डावपेच आणि मतांची योग्य गोळाबेरीज करून उदयनराजे यांनी वेदांतिकाराजेंविरोधात सामान्य महिलेला नगराध्यक्षा पदाच्या खुर्चीवर बसविले.

मात्र, या निवडणुकीनंतर आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी ‘आरे ला कारे’ उत्तर द्यायचं ठरवलं. त्यानंतर ठोका-ठोकी, धुमसा-धुमसी इथपासून खुन्नस देण्यापर्यंतचे सर्व प्रकार सातारकरांनी पाहिले. दोन्ही राजेंच्यामध्ये असेच तणावपूर्ण वातावरण राहिले तर लोकसभेच्या निवडणुकीत काही गंभीर प्रसंग उद्भवतील, अशी शंकाही उपस्थित केली जात होती. पण पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी दिलेले आदेश आणि जिल्ह्यातील अन्य आमदारांनी दिलेली साद बघता या दोन्ही राजेंचे मनोमिलन होणार, अशी खात्री सामान्यांना होतीच.

सोमवारी रात्री उशिरा उदयनराजे कºहाडहून साताºयाच्या दिशेने येत असताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिवेंद्रसिंहराजे यांची भेट घेण्याबाबत सांगितले. त्यानुसार रात्री दहाच्या सुमारास हे दोन्ही नेते आपल्या निवडक कार्यकर्त्यांसह हॉटेलात दाखल झाले.उदयनराजे यांनी भेटायला आलेल्या शिवेंद्रसिंहराजे यांच्याबरोबर सुमारे दीड तास चर्चा केली. या चर्चेत पालिका निवडणुकांच्यावेळी निर्माण झालेले गैरसमज, चुकीच्या पद्धतीने मिळालेले निरोप यासह शहरात शांतता आणि विकास साधायचा असेल तर एकत्र येणं गरजेचे असल्यावर एकमत झाले.

राजघराण्यातील मोठ्या वादांवर पडदा टाकून दीड दशकांपूर्वी केलेले मनोमिलन आणि त्या तुलनेने गेल्या काही वर्षांतील वाद किरकोळ असल्याचेही निदर्शनास आणून देण्यात आले.साताºयाच्या विकासासाठी परस्परांना मदत करून पुढे जाण्याचंही यावेळी निश्चित करण्यात आलं. त्यानंतर दोन्ही राजेंनी एकत्र अर्धा तास कमरा बंद चर्चा केली.भेटीतला ७ आकडा साथ देणार?सातारा येथील पोवई नाका परिसरात असलेल्या एका हॉटेलमध्ये उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजे यांची सोमवारी रात्री दहाच्या सुमारास भेट घेतली. या भेटीसाठी उदयनराजे भोसले, शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह सुनील काटकर, नरेंद्र पाटील उपस्थित होते. या भेटीसाठी हॉटेलात येताना शिवेंद्रसिंहराजे त्यांच्या कार्यकर्त्यांच्या ७० क्रमांक असलेल्या गाडीतून आले. ही बैठक झाली त्या खोलीचा क्रमांकही ७७ आहे. या भेटीतील ७ आकडा साथ देणारा ठरणार, असा कयास व्यक्त होत आहे.