दोन्ही राजेंचा मेडिकल कॉलेजवर फोकस!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:16 IST2021-02-05T09:16:04+5:302021-02-05T09:16:04+5:30
उदयनराजे यांची केंद्रात तर शिवेंद्रराजे राज्य सरकारकडे फिल्डिंग लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : साताऱ्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी दोन्ही राजेंनी ...

दोन्ही राजेंचा मेडिकल कॉलेजवर फोकस!
उदयनराजे यांची केंद्रात तर शिवेंद्रराजे राज्य सरकारकडे फिल्डिंग
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : साताऱ्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी दोन्ही राजेंनी जोरदार मोर्चेबांधणी केल्याचे समोर येत आहे. उदयनराजेंनी केंद्राकडे तर शिवेंद्रसिंहराजेंनी राज्य शासनाकडे यासंदर्भात पाठपुरावा करून यश मिळवले आहे.
शासकीय मेडिकल कॉलेजच्या संदर्भात खासदार उदयनराजे भोसले यांनी मंगळवारी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांची भेट घेतली. वाढवू जागांना परवानगी मिळावी अशी मागणी केली.
या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी नुकताच ४९५ कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारने मंजूर केलेला आहे. जागा हस्तांतराचा प्रश्नही संपुष्टात आला असल्याने आता लवकरच कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या जागेमध्ये हे प्रशस्त वैद्यकीय महाविद्यालय उभारले जाणार आहे. या वैद्यकीय महाविद्यालयासाठी सातारकरांना मोठी वाट पाहावी लागली आहे. आता महाविद्यालय उभारणीचा अनुषंगाने वेगाने हालचाली सुरू झाल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी दिल्लीत गेलेल्या खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारा शासकीय मेडिकल कॉलेज च्या संदर्भात आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांची भेट घेतली. या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या वाढीव जागांसाठी केंद्र सरकारने परवानगी द्यावी अशी महत्वपूर्ण मागणी त्यांनी केली.
तर दुसऱ्या बाजूला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी देखील या महाविद्यालयाच्या उभारणीसाठी पाठपुरावा सुरू ठेवला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी या पाठपुराव्याची दखल घेत वैद्यकीय महाविद्यालय साठी लागणारे सर्व परवानग्या दिल्या आहेत आर्थिक निधी देखील उपलब्ध केला आहे. रुग्णालय तसेच महाविद्यालयासाठी लागणारा ५१० कर्मचारी वर्ग याचा आकृतीबंध शासनाने मंजूर केला आहे आता लवकरच केली जाऊ शकते.
पालिका निवडणुकीपूर्वीचा श्रेयवाद
सातारा नगरपालिका निवडणूक तोंडावर असताना दोन्ही राज्यांनी विविध विकासकामांच्या पाठपुराव्याला वेगाने सुरुवात केली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हा संपूर्ण सातारा जिल्ह्याचा विषय असला तरी देखील इतर लोकप्रतिनिधींनी याबाबत केलेले नाही तसेच प्रसिद्धीपत्रक काहीही दिलेले नाही मात्र दोन्ही राजेंकडून याबाबत पत्र देऊन श्रेयवाद घेण्यास सुरुवात केली आहे.