शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आले एकत्र; अजित पवारही सोबत, कारण काय?

By नितीन काळेल | Updated: October 2, 2024 20:54 IST

Satara News: राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार साताऱ्यात अनेकवेळा आले. पण, त्यांच्याबरोबर शरद पवार गटातील कोणीही नेता दिसला नव्हता. मात्र, बुधवारी जिल्हा बॅंक कार्यक्रमाच्या निमित्ताने अजित पवार यांच्याबरोबर दोन्ही राष्ट्रवादीतील नेते एकाच टेबलवर जेवणासाठी बसल्याचे दिसून आले.

- नितीन काळेल  सातारा - राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार साताऱ्यात अनेकवेळा आले. पण, त्यांच्याबरोबर शरद पवार गटातील कोणीही नेता दिसला नव्हता. मात्र, बुधवारी जिल्हा बॅंक कार्यक्रमाच्या निमित्ताने अजित पवार यांच्याबरोबर दोन्ही राष्ट्रवादीतील नेते एकाच टेबलवर जेवणासाठी बसल्याचे दिसून आले. यामुळे राजकीय चर्चांनाही उधान आले.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचा अमृतमहोत्सवी सांगता सोहळा साताऱ्यातील सैनिक स्कूलच्या मैदानावर होता. यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आले होते. कार्यक्रमासाठी दुपारी साडे बाराच्या सुमारास अजित पवार यांचे हेलिकाॅप्टरने आगमन झाले. यावेळी विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील, शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष नितीन पाटील, उपाध्यक्ष अनिल देसाई, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्यासह जिल्हा बॅंकेचे संचालक उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आल्यानंतर उपस्थित नेत्यांशी चर्चा केली. त्यानंतर सैनिक स्कूल मैदानावरील सभास्थानाच्या पाठीमागेच प्रमुख राजकीय नेते, जिल्हा बॅंक संचालकांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती तेथे आले. यावेळी अजित पवार यांच्याबरोबर रामराजे, बाळासाहेब पाटील, मकरंद पाटील टेबलवर एकत्र जेवण करताना दिसून आले. विशेष म्हणजे भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसलेही यामध्ये सहभागी झाले होते. राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर या पक्षातील प्रमुख नेते एकत्र कधी आले नव्हते. पण, जिल्हा बॅंकेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्हावासीयांना वेगळेच दृष्य दिसले. यामधील रामराजे, बाळासाहेब पाटील, मकरंद पाटील, शिवेंद्रसिंहराजे हे जिल्हा बॅंकेचे संचालक आहेत.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारSatara areaसातारा परिसर