शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

कुत्र्याची पिल्ले चोरणारे दोघे अटकेत, सातारा पोलीस ठाण्यात तक्रार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 10:18 IST

सातारा : जर्मन शेफर्ड जातीची कुत्र्याची तीन पिल्ले चोरून नेल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने दोघांना अटक केली. ...

ठळक मुद्देकुत्र्याची पिल्ले चोरणारे दोघे अटकेत, सातारा पोलीस ठाण्यात तक्रार गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई

सातारा : जर्मन शेफर्ड जातीची कुत्र्याची तीन पिल्ले चोरून नेल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने दोघांना अटक केली. त्यांच्याकडून चोरीची तीन पिल्ले ताब्यात घेण्यात आली असून, ही पिल्ले संबंधित मालकाच्या स्वाधीन करण्यात आली आहेत.विकी युवराज अडसूळ (वय २१), अनिरुद्ध वसंत खराशीकर (वय २०, दोघे रा. शाहूनगर सातारा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, डॉ. सुधीर शिंदे (रा. विलासपूर, सातारा) यांनी जर्मन शेफर्ड जातीची कुत्री पाळली होती. या कुत्रीला २० फेब्रुवारीला नऊ पिल्ले झाली होती. त्यापैकी काही पिल्ले त्यांनी इतरांना दिली होती. सध्या त्यांच्याकडे तीन पिल्ले होती. दरम्यान, दि. १९ रोजी रात्री अज्ञातांनी ही पिल्ले चोरून नेली. याबाबत डॉ. शिंदे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.गुन्हे प्रकटीकरण शाखेने तपास केल्यानंतर विकी आणि अनिरूद्ध या दोघांसह एका अल्पवयीन मुलाने ही पिल्ले चोरून नेल्याची माहिती या टीमला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यांनी पिल्ले चोरल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्याकडून तिनीही पिल्ले ताब्यात घेतली.

ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रदीपक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक ढेकळे, पोलीस नाईक निलेश गायकवाड, अनिल स्वामी, धीरज कुंभार, संतोष भिसे, अविनाश चव्हाण, पंकज ठाणे, सुनिल भोसले, मुनिर मुल्ला यांनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर