मल्हारपेठला अग्नितांडवात महिलेसह दोघांचा मृत्यू
By Admin | Updated: November 13, 2015 23:37 IST2015-11-13T23:19:17+5:302015-11-13T23:37:41+5:30
फटाक्यांचा धमाका : दुकान खाक; दोन जखमी

मल्हारपेठला अग्नितांडवात महिलेसह दोघांचा मृत्यू
मल्हारपेठ : पाटण तालुक्यातील मल्हारपेठ येथील बाजार समितीच्या पत्र्याच्या गाळ्यातील दुकानास गुरुवारी सायंकाळी आग लागून दोनजणांचा धुरात गुदमरून मृत्यू झाला. दोन गंभीर जखमींवर मिरज येथे उपचार सुरू असून, मृतांत दुकानमालक आणि एका महिलेचा समावेश आहे. दोघेही विहे (ता. पाटण) गावचे रहिवासी आहेत.
रूपाली व्हरायटीज असे आगीत खाक झालेल्या दुकानाचे नाव असून, दुकानाचे मालक राजेंद्र मारुती भोसले (वय ४५) आणि पुष्पा विजय यादव (६०) अशी मृतांची नावे आहेत. मल्हारपेठ बसस्थानकाजवळ बाजार समितीचे गाळे असून, तेथेच हे दुकान आहे.
गुरुवारी (दि. १२) सायंकाळी पाचच्या सुमारास दुकानाच्या बाहेर मांडलेल्या फटाक्यांना अचानक आग लागून मोठा धमाका झाला. मोठा आवाज ऐकून बाजारपेठेतील व्यापारी, ग्रामस्थ घटनास्थळी धावले. मात्र, काही समजण्याच्या आतच आगीने (पान ८ वर)
शोक आणि नाराजी
शुक्रवारी (दि. १३) दुपारी एक वाजेपर्यंत बाजारपेठ बंद ठेवून व्यापाऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी जळीतकांडातील मृतांना श्रद्धांजली वाहिली. मल्हारपेठमध्ये अशी घटना प्रथमच घडल्याने हळहळ व्यक्त होत होती. विहे गावावरही ऐन दिवाळीत शोककळा पसरली होती. दरम्यान, अग्निशमन दल, पोलीस यंत्रणा आणि आरोग्य विभागाची यंत्रणा घटनास्थळी उशिरा पोहोचल्यामुळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली.