दोघांची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:46 IST2021-09-09T04:46:59+5:302021-09-09T04:46:59+5:30

सातारा : जिल्ह्यातील सातारा शहर आणि फलटण तालुक्यात दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. त्यामध्ये एक युवक ...

Both committed suicide by strangulation | दोघांची गळफास घेऊन आत्महत्या

दोघांची गळफास घेऊन आत्महत्या

सातारा : जिल्ह्यातील सातारा शहर आणि फलटण तालुक्यात दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. त्यामध्ये एक युवक आणि एका वृद्धाचा समावेश आहे. या दोन्ही घटना मंगळवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास घडल्या आहेत.

श्रीरंग मारुती जाधव (वय ६७, रा. जाधव चाळ, समर्थनगर कोडोली, सातारा), अमिर मुक्तम शेख (२६, रा. तांबमळा, फरांदवाडी, ता. फलटण) अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी देलेली माहिती अशी, श्रीरंग जाधव यांनी मंगळवारी, दि. ७ रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास शिवराज पेट्रोल पंपासमोरील झाडीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यांच्या मुलाने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी कोणत्या कारणातून आत्महत्या केली, हे अद्याप समोर आले नाही. या घटनेची सातारा शहर पोलीस ठाण्यात नाेंद झाली आहे.

दुसरी घटना फलटण तालुक्यातील फरांदवाडी येथे घडली. अमिर शेख यानेही मंगळवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. किडनी स्टोन आजाराला कंटाळून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत आसिफ शेख (वय २१) याने फिर्याद फलटण शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Web Title: Both committed suicide by strangulation