शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

तडीपारीचा भंग करणाऱ्या दोघांना अटक, कार्वेत कारवाई : पाठलाग करून पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 11:46 IST

कऱ्हाड : तडीपारी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. कार्वे, ता. कऱ्हाड येथे शुक्रवारी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गुन्हे ...

ठळक मुद्देतडीपारीचा भंग करणाऱ्या दोघांना अटककार्वेत कारवाई : पाठलाग करून पकडले

कऱ्हाड : तडीपारी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. कार्वे, ता. कऱ्हाड येथे शुक्रवारी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गुन्हे पथकाने ही कारवाई केली.सागर सदाशिव हुलवान (वय २३) व विशाल सदाशिव हुलवान (२३, दोघेही रा. कार्वे) अशी याप्रकरणी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्वे येथील सागर हुलवान आणि विशाल हुलवान या दोघांना जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. मात्र, तडीपारी आदेशाचा भंग करून हे दोघेजण कार्वे येथे वावरत असल्याची माहिती ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार सहायक निरीक्षक चंद्रकांत माळी, पोलीस नाईक शशिकांत काळे, सज्जन जगताप, शशिकांत घाडगे आणि अमित पवार यांच्या पथकाने शुक्रवारी कार्वे येथे छापा टाकलासंशयित सागर हुलवान हा कार्वे-कोडोली रस्त्यावर पोलिसांना आढळून आला. पोलिसांना पाहताच त्याने पलयान केले. मात्र, पोलीस पथकाने पाठलाग करून त्याला पकडले. तर विशाल हुलवान हा गावातील अहिल्यानगरमध्ये होता.

 त्यानेही पोलिसांना पाहताच उसाच्या शेतातून धूम ठोकली. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून उसाच्या फडातच त्याला ताब्यात घेतले. दोघांनाही ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. याबाबतची नोंद कऱ्हाड ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली असून, सहायक निरीक्षक चंद्रकांत माळी तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसSatara areaसातारा परिसर