शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
3
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
4
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
5
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
6
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
7
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
8
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
9
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
10
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
11
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
12
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
13
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
14
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
15
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
16
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
17
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
18
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
19
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?

Satara News: बोरगावचे जवान सुभाष उंबरे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2023 16:46 IST

अमित जगताप नागठाणे : बोरगाव येथील सैन्यात नायब सुभेदारपदी कार्यरत असणारे सुभाष हिरालाल उंबरे (वय-३८) यांचे देशसेवा बजावत असताना ...

अमित जगतापनागठाणे : बोरगाव येथील सैन्यात नायब सुभेदारपदी कार्यरत असणारे सुभाष हिरालाल उंबरे (वय-३८) यांचे देशसेवा बजावत असताना अल्प आजाराने निधन झाले. सुभाष उंबरे हे सध्या उत्तर प्रदेशातील आग्रा येथे देशसेवा बजावत होते. त्यांच्यावर आज, सोमवारी बोरगाव या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी ‘नायब सुभेदार सुभाष उंबरे अमर रहे...’च्या जयघोष करण्यात आला.शहीद सुभाष उंबरे ते सैन्यात ईएमई क्लार्क पदावर कार्यरत होते. त्यांना नुकतीच नायब सुभेदारपदी पदोन्नती झाली होती. त्यांचा बोरगावातील विविध सामाजिक कार्यात हिरीरीने सहभाग असायचा. नवतरुण दुर्गामाता तालीम संघ या मंडळाच्या माध्यमातून त्यांनी विविध सामाजिक उपक्रम प्रभावीपणे राबविले होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण बोरगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले होते. नागठाण्यातील श्रीरामकृष्ण विद्यालयातून त्यांनी आपले माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. खंडाळा येथे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करत असताना ते सैन्यात भरती झाले.त्यांचे पार्थीव आज, सोमवारी सकाळी दहा वाजता सातारा तालुक्यातील बोरगाव या मूळ गावी आणले. त्यावेळी त्यांची आई, पत्नी आणि मुलगी सोबतच भाऊ यांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. त्यांचे घरापासून अगदी स्मशानभूमीपर्यंत सडा टाकून रांगोळी काढली होती. तिथून त्यांचे घरापासून ते खालची वस्ती पुढे स्मशानभूमी पर्यंत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी नागठाणे तसेच बोरगावमधील समस्थ ग्रामस्थ उपस्थित होते. ‘नायब सुभेदार सुभाष उंबरे अमर रहे’, ‘भारतमाता की जय’, ‘वंदे मातरम’ या घोषणा देण्यात आल्या. त्याचबरोबर परिसरातील बोरगाव गावातील संपूर्ण दुकाने दिवसभर बंद करून व्यापाऱ्यांनीही आदरांजली वाहिली. एनसीसी तसेच सुभेदार चंद्रकांत पवार, कल्याण संघटक, जिल्हा सैनिक अधिकारी, सहायक जिल्हा सैनिक अधिकारी, सुभेदार विलासराव घाडगे, हवालदार राजेंद्र जगदाळे, कैलास जाधव, नायब तहसीलदार दयानंद कोळेकर, गटविकास अधिकारी उदयसिंह साळुंखे, सहायक गटविकास अधिकारी जयवंत साळुंखे, बोरगावचे सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे, मंडलाधिकारी विठ्ठल तोरडमल, तलाठी सुहास जाधव, अनुराधा सवई, सरपंच सतीश साळुंखे, उपसरपंच अमित साळुंखे, ग्रामविकास अधिकारी सदाशिव खांडके, विकास सेवा सोसायटीचे चेअरमन जयवंत साळुंखे, व्हाईस चेअरमन आप्पासाहेब कोळेकर यांनी आदरांजली वाहिली. पोलिसांनी बंदूकीच्या तीन फैरी हवेत झाडून मानवंदना दिली. यानंतर त्यांचा भाऊ आणि मुलगीने मुखाग्नी दिला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर