बांधाच्या वादातून बोअरवेल मुजवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:39 IST2021-04-06T04:39:02+5:302021-04-06T04:39:02+5:30
सातारा : बांधाच्या वादातून शेतात असलेले बोअरवेल मुजवल्याची घटना जकातवाडी (ता.सातारा) येथे घडली. याप्रकरणी दिलीप बाबुराव जाधव, शेअरअली शौकत ...

बांधाच्या वादातून बोअरवेल मुजवले
सातारा : बांधाच्या वादातून शेतात असलेले बोअरवेल मुजवल्याची घटना जकातवाडी (ता.सातारा) येथे घडली. याप्रकरणी दिलीप बाबुराव जाधव, शेअरअली शौकत बागवान, नफीसा इकबाल शेख, शाहीन जब्बार शेख (सर्व रा. सातारा) यांच्याविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, जकातवाडी (ता.सातारा) येथे अनवर आलेखान मुल्ला (रा. शिरवडे,ता. कऱ्हाड) यांची व संशयितांची शेतजमीन शेजारी शेजारी आहे. त्यांच्यात जमिनीवरून वाद सुरू आहेत. त्याच वादाच्या रागातून ४ रोजी संशयितांनी जकातवाडी येथील गट क्रं (३२) १ मधील मुल्ला यांच्या मालकीच्या शेताचा बांध फोडून त्यात शेतात असलेली बोअरवेल मुजवून टाकल्याचे समोर आले. पुढील तपास पोलीस निरीक्षक सजन हंकारे हे करत आहेत.