शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

ग्रंथ महोत्सव -- जागर वाचन संस्कृतीचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 01:07 IST

राजधानी दिल्ली येथील साहित्य अकादमीला भुरळ घालणारा राजधानी साताऱ्याचा ग्रंथमहोत्सव दोन दशकांची वाटचाल करत सुवर्णमहोत्सवाच्या दिशेने सरकू लागला आहे. वाचन संस्कृतीच्या

- प्रगती जाधव - पाटील

राजधानी दिल्ली येथील साहित्य अकादमीला भुरळ घालणारा राजधानी साताऱ्याचा ग्रंथमहोत्सव दोन दशकांची वाटचाल करत सुवर्णमहोत्सवाच्या दिशेने सरकू लागला आहे. वाचन संस्कृतीच्या जागराला वाहिलेले पालखीचे भोई कोणत्याही हेतूशिवाय एकत्र असताना अक्षर चळवळीचा हा जगन्नाथरुपी रथ पुढे जातो आहे, हेच साताºयाच्या मातीचे आणि येथे रुजलेल्या पुरोगामी संस्कृतीचे वैशिष्ट्यआहे.आज साताºयाचा ग्रंथमहोत्सव खºया अर्थाने तारुण्यात आहे. साहित्य वर्तुळात समीक्षेची कठोर वाणी बोलणाºया साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी ग्रंथमहोत्सवाच्या यशस्वीतेचे मनापासून कौतुक केले. एरव्ही वाङमय पातळीवर अ ब क ड च्या भाषेत साहित्याची शास्त्रीय समीक्षा करणारे समीक्षकनकोसे वाटतात. तिथे डॉ. सबनीस यांनी साताºयाच्या ग्रंथमहोत्सवाच्या यशाचे रहस्य ‘ग्रंथ संस्कारच माणसाला जगवणारा आहे,’ अशा शब्दांत उलगडले. येथील साहित्य भोई कोणत्याही अहगंडाशिवाय वाचन संस्कृतीच्या जागरासाठी एकत्र येतात. शासकीय अधिकारी पदाधिकारी यांचे खºयाखुºया संघभावनेचे अद्वैत रूप येथे पाहायला मिळते.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी व्हिजन २०१९ साठी जलसंवर्धनाचा संकल्प केला आहे. त्या संकल्पाला शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणारा जलक्रांतीचा परिसंवाद एक साधक बाधक चर्चा ग्रंथमहोत्सवाच्या व्यासपीठावर झाली आणि जलसंवर्धनाचे गांभीर्य फार उत्कट पातळीवरून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले, हाच ग्रंथ संस्कार अथवा जाणिवांची निर्मिती ग्रंथ महोत्सवाचा हेतू आहे आणि तो फलद्रूप होताना पाहणे याचि देही याचि डोळा ‘आनंद तरंग’ अनुभव आहे.पहिल्या दशकाच्या वाटचालीत ग्रंथमहोत्सवाचा यूएसपी ठरणारे परिसंवाद प्रगल्भ साहित्य मंडळीसाठी असायचे; पण साताºयाच्या ग्रंथमहोत्सवाने ही परंपरा मोडीत काढत अक्षर संस्कृतीचे नव सृजन करणाºया नव्या लेखकांना वाचकांना आपल्यामध्ये सामावून घेतले! त्यांच्या बौद्धिकतेला चालना मिळावी यासाठी नवलेखक, कवी यांना व्यासपीठ मिळवून दिले आहे. याठिकाणी देणारे परिसंवाद हेच वैशिष्ट्य आहे.