शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

पसरणी घाटात आढळला महिलेचा मृतदेह, घातपाताचा संशय; तपास सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 11:58 IST

वाई-पाचगणी मार्गावर असलेल्या पसरणी घाटातील दरीत एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला. ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. दरम्यान, संबंधित महिलेची हत्या करून मृतदेह दरीत टाकला असावा, असा अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.

ठळक मुद्देपसरणी घाटात आढळला महिलेचा मृतदेहघातपाताचा संशय; तपास सुरू

पसरणी : वाई-पाचगणी मार्गावर असलेल्या पसरणी घाटातील दरीत एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला. ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. दरम्यान, संबंधित महिलेची हत्या करून मृतदेह दरीत टाकला असावा, असा अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वाई शहरासह परिसरात राहणारे नागरिक दररोज सकाळी पसरणी घाटात मॉर्निंग वॉकसाठी येतात. शुक्रवारी सकाळी काही नागरिकांकडून घाटातील सुमारे वीस फूट खोल दरीत महिलेचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

यानंतर वाई पोलीस ठाण्याचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोरीच्या साह्याने व नागरिकांच्या मदतीने संबंधित महिलेचा मृतदेह दरीतून बाहेर काढला.

एक ते दोन दिवसांपासून हा मृतदेत दरीत पडून राहिल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली होती. संबंधित महिलेची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.दरम्यान, दरीत मृतदेह आढळल्याने पोलिसांनी घातपाताचा संशय व्यक्त केला असून, त्या दृष्टीने तपास सुरू केला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrimeगुन्हा