धोम धरणाच्या डाव्या कालव्यात मृतदेह आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:42 IST2021-04-23T04:42:13+5:302021-04-23T04:42:13+5:30

वेळे : वाई येथील धोम धरणाच्या डाव्या कालव्यातील पाण्याच्या प्रवाहाबरोबर एका अनोळखी २८ वर्षीय पुरुष जातीचा मृतदेह वाहत पांडे ...

The body was found in the left canal of Dhom dam | धोम धरणाच्या डाव्या कालव्यात मृतदेह आढळला

धोम धरणाच्या डाव्या कालव्यात मृतदेह आढळला

वेळे : वाई येथील धोम धरणाच्या डाव्या कालव्यातील पाण्याच्या प्रवाहाबरोबर एका अनोळखी २८ वर्षीय पुरुष

जातीचा मृतदेह वाहत पांडे (ता. वाई) गावच्या हद्दीतील पेटी पुलाजवळ आढळून आला.

याची माहिती भुईंज पोलीस ठाण्यात समजताच पोलीस घटनास्थळावर तातडीने दाखल झाले. हवालदार बापूराव धायगुडे आणि बोपेगाव तेथील तात्या सावंत या दोघांनी कुणाच्याही मदतीची अपेक्षा न करता तातडीने कालव्यात उतरून झुडपात अडकलेला मृतदेह बाहेर काढून त्याचा पंचनामा करून तो मृतदेह शवविच्छेदनासाठी कवठे (ता. वाई) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविला आहे. या घटनेची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात झाली आहे. मृतदेह नक्की कुणाचा आहे, याचा शोध भुईंज पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार बापूराव धायगुडे घेत आहेत.

Web Title: The body was found in the left canal of Dhom dam