शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

कवठे येथे ज्वारी पिकामध्ये आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2021 12:16 IST

Crimenews Police Satara- कवठे ( ता. वाई ) येथील महामार्गालगत असलेल्या किसन वीर स्मारकाशेजारील ज्वारीच्या उभ्या पिकामध्ये एका पुरुष व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे.

ठळक मुद्देकवठे येथे ज्वारी पिकामध्ये आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह

वेळे : कवठे ( ता. वाई ) येथील महामार्गालगत असलेल्या किसन वीर स्मारकाशेजारील ज्वारीच्या उभ्या पिकामध्ये एका पुरुष व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे.याबाबत अधिक माहिती अशी कवठे येथील किसन वीर स्मारकाशेजारील भानुदास पोळ यांच्या शेतातील ऊस तोडणी सुरु असताना ऊस तोडणीसाठी असलेले कामगार शेजारील ज्वारीमध्ये गेले असता त्यांना ज्वारीमध्ये एक पुरुष व्यक्ती झोपलेल्या अवस्थेत दिसली. म्हणून त्यांनी जवळ जाऊन पाहिले.

संबंधित व्यक्ती मृत झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी हा प्रकार घटनास्थळावर उपस्थित असलेल्या अविनाश देवकर व शेतमालक संदीप पोळ यांना सांगितला. संदीप पोळ यांनी भुईंज पोलीस स्टेशनला फोन करून घटनेची माहिती दिली.घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार अंदाजे ४५ वय असलेला अंगात लाल बनियान व काळ्या रंगांची पँन्ट परिधान केलेला पुरुष ज्वारी पिकात मधोमध मृतावस्थेत आढळून आला आहे. मृताच्या शरीरावर मारहाणीचे व्रण दिसत असून त्याच्या उजव्या कानात बाळी घातलेली आहे .

अंदाजे २ ते ३ दिवसांपूर्वी सदर व्यक्ती मृत झाला असण्याची शक्यता आहे व ज्या ठिकाणी मृतदेह पडला होता त्याच्या आसपासच्या ज्वारी पिकाची झटापटीत नासाडी झाल्याचे प्राथमिक अंदाजात दिसून येत आहे. पोशाखावरून सदर व्यक्ती ही उसतोड टोळीतील कामगार किंवा एखाद्या ट्रकवरील क्लीनर असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

डोक्याच्या पाठीमागेसुद्धा मारहाण झाली आहे. याबाबतची माहिती भुईंज पोलीस स्टेशनचे स.पो.नि. आशिष कांबळे यांना कळताच त्यांनी तातडीने उपनिरीक्षक निवास मोरे, फौजदार अवघडे, डी.एन. गायकवाड, सी.एम. मुंगसे व कॉन्सटेबल मंदार शिंदे यांना घटनास्थळावर पाठविले. उत्तरीय तपासणी व शवविच्छेदन कवठे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसरPoliceपोलिस