शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Satara: मुलाला वाचविताना वाहून गेलेल्या पित्याचा मृतदेह सापडला, पिता-पुत्राचा मृत्यूने तालुक्यात हळहळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2024 12:26 IST

खंडाळा (जि. सातारा) : धोम-बलकवडी प्रकल्पाच्या कालव्याच्या प्रवाहात वाहून चाललेल्या मुलाला वाचविण्यासाठी प्रवाहात उडी मारलेल्या अजनुज येथील पित्याचा मृतदेह ...

खंडाळा (जि. सातारा) : धोम-बलकवडी प्रकल्पाच्या कालव्याच्या प्रवाहात वाहून चाललेल्या मुलाला वाचविण्यासाठी प्रवाहात उडी मारलेल्या अजनुज येथील पित्याचा मृतदेह तब्बल २० तासांनंतर हाती लागला आहे. या घटनेत पिता-पुत्राचा मृत्यू झाल्याने तालुक्यातून हळहळ व्यक्त होत आहे. विक्रम पवार असे मृत पित्याचे नाव आहे.अजनूज येथील विक्रम पवार हे गोधडी धुण्यासाठी रविवारी दुपारी धोम-बलकवडीच्या कालव्यावर गेले होते. सोबत वडील, पत्नी आणि त्यांचा मुलगा शंभूराज पवार हादेखील गेला होता. ते गोधडी धूत असताना छोटा शंभूराज पाण्यात उतरला. त्यामुळे प्रवाहात तो वाहत गेला. त्याला वाचविण्यासाठी विक्रम यांनीही पाण्यात उडी घेतली. मात्र, पाण्याची गती अधिक असल्याने दोघेही पाण्यात वाहून गेले. ग्रामस्थ व रेस्क्यू टीमने पाण्यात शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दोन तासांत कालव्याच्या प्रवाहात मुलगा शंभूराजचा मृतदेह आढळून आला. मात्र, पित्याचा शोध लागला नाही. कालव्याचे पाणी बंद करण्यासाठी प्रयत्न केले. ग्रामस्थांनी रात्रभर शोधकार्य सुरूच ठेवले. सकाळी पाणी कमी झाल्यावर तब्बल २० तासांनंतर विक्रम पवार यांचा मृतदेह आढळला. शोकाकुल वातावरणात दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरdrowningपाण्यात बुडणेDeathमृत्यू