उरमोडी नदीत पुरुषाचा मृतदेह आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:46 IST2021-03-01T04:46:47+5:302021-03-01T04:46:47+5:30

सातारा : सोनगाव, तर्फ, ता. सातारा गावच्या हद्दीतील उरमोडी नदीपात्रात ४५ वर्षीय पुरुषाचा मृतदेह तरंगताना आढळून आला. ही घटना ...

The body of a man was found in the river Urmodi | उरमोडी नदीत पुरुषाचा मृतदेह आढळला

उरमोडी नदीत पुरुषाचा मृतदेह आढळला

सातारा : सोनगाव, तर्फ, ता. सातारा गावच्या हद्दीतील उरमोडी नदीपात्रात ४५ वर्षीय पुरुषाचा मृतदेह तरंगताना आढळून आला. ही घटना शनिवारी सकाळी आठ वाजता उघडकीस आली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विश्वास शेळके हे उरमोडी नदीवरील मोटार शेतात पाणी देण्यासाठी सुरू करण्यासाठी गेले होते. त्यावेळी मृतदेह पाण्यावर तरंगताना त्यांना दिसला. या प्रकाराची माहिती त्यांनी तात्काळ पोलीस पाटील संजय सपकाळ यांना दिली. त्यानंतर त्यांनी याची माहिती सातारा तालुका पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. संबंधित व्यक्तीच्या डाव्या हाताच्या पोटरीवर लव्ह बदामाचे चिन्ह आहे. याबाबत कोणास माहिती असल्यास सातारा तालुका पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक मनोहर फरांदे यांनी केले आहे.

Web Title: The body of a man was found in the river Urmodi