यवतेश्वर घाटातील दरीत मुलीचा मृतदेह आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:38 IST2021-04-15T04:38:04+5:302021-04-15T04:38:04+5:30

पेट्री : सातारा - कास मार्गावरील यवतेश्वर घाटात बुधवारी सकाळी संभाजीनगर येथील बेपत्ता असलेल्या युवतीचा खोल दरीत मृतदेह सापडल्याची ...

The body of a girl was found in a valley in Yavateshwar Ghat | यवतेश्वर घाटातील दरीत मुलीचा मृतदेह आढळला

यवतेश्वर घाटातील दरीत मुलीचा मृतदेह आढळला

पेट्री :

सातारा - कास मार्गावरील यवतेश्वर घाटात बुधवारी सकाळी संभाजीनगर येथील बेपत्ता असलेल्या युवतीचा खोल दरीत मृतदेह सापडल्याची घटना घडली. सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या पोलिसांना याची माहिती समजताच पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह दोनशे, अडीचशे फूट खोल दरीत असल्याने ट्रेकर्सद्वारे तो वर काढण्यात आला.

यवतेश्वर घाटातील कठड्यावर बॅग आढळून आली. या बॅगेत असलेल्या आधारकार्डावरील माहितीनुसार दरूज (ता. खटाव ) येथील शीतल नितीन पाटोळे ( वय १७) असे या युवतीचे नाव आहे. ही युवती बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस स्थानकात काही दिवसांपूर्वी दाखल झाली होती. शवविच्छेदनानंतर मृत्यूचे नेमके कारण समजू शकणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: The body of a girl was found in a valley in Yavateshwar Ghat