पोहताना नदीत बुडालेल्या मुलाचा मृतदेह आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:41 IST2021-05-09T04:41:18+5:302021-05-09T04:41:18+5:30

गुरुवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मल्हारपेठ येथील विकास पंडित हे आपला मुलगा विश्वजित याच्यासह निसरे येथे कोयना नदीवर पोहण्यासाठी ...

The body of a boy who drowned in the river was found while swimming | पोहताना नदीत बुडालेल्या मुलाचा मृतदेह आढळला

पोहताना नदीत बुडालेल्या मुलाचा मृतदेह आढळला

गुरुवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मल्हारपेठ येथील विकास पंडित हे आपला मुलगा विश्वजित याच्यासह निसरे येथे कोयना नदीवर पोहण्यासाठी आले होते. त्यावेळी पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने विश्वजित नदीतून वाहून गेला. मित्रांनी आरडाओरडा केल्यामुळे नदीकाठावर गेलेल्या विकास पंडित यांनी धावत येऊन नदीमध्ये उडी मारली. त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो हाताला लागला नाही. पाण्याचा वेग आणि दोघांमध्ये अंतर जास्त राहिल्याने तो पाण्यामध्ये बुडाला. पोहताना विकास यांना दम लागल्याने त्यांचे प्रयत्नही थांबले. त्यानंतर तेथे असलेल्या अन्य ग्रामस्थांनीही शोध घेतला. मात्र, तो सापडला नाही. गुरुवार व शुक्रवारी शोध घेतल्यानंतर शनिवारीही शोधकार्य सुरूच होते. शनिवारी दुपारी बोटीच्या साह्याने शोध घेण्यात आला. मृतदेह शोधण्यासाठी निसरे गावासह परिसरातील ग्रामस्थांनी मोठी मदत केली. युवकांनी तीन दिवस नदीपात्रात उतरून विश्वजितचा शोध घेतला. शनिवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास विश्वजितचा मृतदेह आढळून आला.

Web Title: The body of a boy who drowned in the river was found while swimming