फलटण येथे रक्तदान शिबिर उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:36 IST2021-03-28T04:36:16+5:302021-03-28T04:36:16+5:30
फलटण : श्री सन्मती सेवा दल, फलटण शाखेच्यावतीने फलटण येथील रक्तपेढीमध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरास ...

फलटण येथे रक्तदान शिबिर उत्साहात
फलटण : श्री सन्मती सेवा दल, फलटण शाखेच्यावतीने फलटण येथील रक्तपेढीमध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरास उस्फूर्तपणे प्रतिसाद मिळाल्याचे मिहीर गांधी यांनी सांगितले.
फलटण ब्लड बँकेकडून करण्यात आलेल्या रक्तदानाच्या आवाहनास प्रतिसाद देत प्रथमच श्री सन्मती सेवा दलाच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री सन्मती सेवा दलाचे संस्थापक-अध्यक्ष मिहिर गांधी, नूतन अध्यक्ष वीरकुमार दोशी, माजी अध्यक्ष नवजीवन दोशी हे उपस्थित होते. या रक्तदान शिबिरास डॉ. श्रीकांत करवा, डॉ. संतोष गांधी, डॉ. ऋषिकेश राजवैद्य यांनी मार्गदर्शन केले. प्रितम कोठारी, नीलेश दोशी, प्रशांत दोशी, यशराज गांधी, भरतेश दोशी यांचे मोलाचे योगदान मिळाले. समाजातील महिला, पुरुष, मुले आणि मुली यांनी उत्साहपूर्ण वातावरणात रक्तदान केले.