राष्ट्रवादीने आयोजित शिबिरात ५३ जणांचे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:41 IST2021-04-22T04:41:01+5:302021-04-22T04:41:01+5:30
वाई : राज्यात पुन्हा रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. तो भरून काढण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आवाहनानुसार आमदार ...

राष्ट्रवादीने आयोजित शिबिरात ५३ जणांचे रक्तदान
वाई : राज्यात पुन्हा रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. तो भरून काढण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आवाहनानुसार आमदार मकरंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वाई तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित केले होते. यामध्ये ५३ जणांनी रक्तदान केले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. या अनुषंगाने वाई तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रक्तदान शिबिर मंगळवार, दि. २० रोजी सकाळी वाई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतकरी बहुउद्देशीय हॉलमध्ये घेण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रमोद शिंदे, राज्य राष्ट्रवादीचे सरचिटणीस प्रताप पवार, रमेश गायकवाड, दासबाबू गायकवाड, शशिकांत पिसाळ, जिल्हा राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष तेजस शिंदे, राज्य राष्ट्रवादी युवकचे सरचिटणीस गोरख नलावडे, वाई पंचायत समितीच्या सभापती संगीता चव्हाण, वाई पंचायत समितीचे उपसभापती विक्रांत डोंगरे, महादेव मस्कर, उपनगराध्यक्ष अनिल सावंत, वाई बाजार समितीचे सभापती लक्ष्मणराव पिसाळ, वाई बाजार समितीचे उपसभापती दीपक बाबर, बाळासाहेब चिरगुटे उपस्थित होते. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घालून दिलेल्या नियमांचे यावेळी काटेकोर पालन करण्यात आले.