बनवडी येथे ५१ जणांकडून रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:35 IST2021-05-22T04:35:36+5:302021-05-22T04:35:36+5:30
कोपर्डे हवेली : सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताची टंचाई जाववत असल्याने काळाची गरज ओळखून बनवडी येथे ग्रामपंचायत बनवडी व महालक्ष्मी ...

बनवडी येथे ५१ जणांकडून रक्तदान
कोपर्डे हवेली : सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताची टंचाई जाववत असल्याने काळाची गरज ओळखून बनवडी येथे ग्रामपंचायत बनवडी व महालक्ष्मी ब्लड बँक कऱ्हाड यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोनाबाधित रुग्णांना उपचारादरम्यान रक्ताची टंचाई निर्माण होऊ नये यासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ५१ लोकांनी रक्तदान केले. यामध्ये चार महिलांनीही सहभाग नोंदवला. तर दोघांनी प्लाझ्मा दान करण्यासाठी नावे नोंदविली.
या शिबिराचे उद्घाटन पोलीस उपनिरीक्षक अनिल बाबर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच प्रदीप पाटील, उपसरपंच विकास करांडे, जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास, भाऊसाहेब घाडगे, पांडुरंग कोठावळे, श्रीरंग जानराव, आतार, संदीप साळुंखे, नरेश गुप्ता, संपतराव माळी, पल्लवी साळुंखे, दिनकरराव करांडे, कृष्णत करांडे, ग्रामसेवक दीपक हिनुकले उपस्थित होते.
चौकट......
सध्या कोरोनाचे संकट उभे आहे. शासनाने घालून दिलेले निर्बंध आणि नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. तरच आपण ही लढाई जिंकू शकतो. या लढाईत बनवडी ग्रामपंचायत सर्वतोपरी तयार असून गावातील लोकांच्या आरोग्याची काळजी घेणे ही ग्रामपंचायतीचे प्रथम कर्तव्य आहे. त्यामध्ये आम्ही सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य कुठेही कमी पडणार नाही.
- प्रदीप पाटील,
सरपंच.