लोकमत न्यूज नेटवर्क
पाचगणी : कोरोनामुळे सर्वत्रच रक्ताची कमतरता भासत आहे. हीच बाब लक्षात घेऊन आंब्रळ ग्रामस्थांनी अक्षय ब्लड बँक, सातारा यांच्या सहयोगाने रक्तदान शिबिर आयोजित केले होते. या शिबिरात ५० दात्यांनी रक्तदान केले.
यावेळी जिल्हा बँक संचालक राजेंद्र राजपुरे, सरपंच माधुरी आंब्राळे, उपसरपंच उमेश जाधव, सर्व सदस्य, गुलाब आंब्राळे, दिलीप आंब्राळे, युवक व ग्रामस्थ उपस्थित होते. शिबिरात उत्स्फूर्त सहभाग घेणाऱ्या रक्तदात्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
सध्या सर्वत्रच रुग्णांना उपचारामध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. शासन अनेकदा रक्तदानाचे आवाहन करत आहे. आपल्या रक्ताच्या थेंबाने कोणाचे आयुष्य पुन्हा फुलावे, याच उदात्त हेतूने रक्तदान शिबिर आयोजित केले, असे मत यावेळी सरपंच माधुरी गुलाब आंब्राळे यांनी व्यक्त केले.
फोटो : १४ रक्तदान शिबिर