बांगलादेशात पुन्हा ब्लॉगरची हत्या
By Admin | Updated: August 7, 2015 22:09 IST2015-08-07T22:09:03+5:302015-08-07T22:09:03+5:30
बांगलादेशातील धर्मनिरपेक्ष ब्लॉगर नीलोय नील चौधरी याची त्याच्या घरीच भोसकून हत्या करण्यात आली असून, देशातील ही चौथी ब्लॉगर हत्या

बांगलादेशात पुन्हा ब्लॉगरची हत्या
संजीव वरे -वाई तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला थोड्याफार फरकाने समान ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळवता आले आहे. तालुक्यातील महत्त्वाच्या बावधन ग्रामपंचायतीमध्ये शशिकांत पिसाळ यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने पुन्हा वर्चस्व राखले आहे. तर पश्चिम भागात काँग्रेसचे बापूसाहेब शिंदे व विकास शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने चिखली ग्रामपंचायतीत सत्ता मिळविली आहे.बहुतेक गावात स्थानिक गट व तेथील प्रश्नावर निवडणूक झाली. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना कमी-जास्त फरकाने ग्रामपंचायती मिळविता आल्या आहेत. तालुक्यातील तीन गावांत सत्तांतर झाले आहे. मागील निवडणुकीत तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व होते. परंतु, गेल्या काही वर्षांत साखर कारखाना, जिल्हा बँक, बाजार समिती, सोसायटी अशा अनेक निवडणुका होऊन गेल्या. त्यातच ग्रामपंचायतीच्या निवडणुकाही जाहीर झाल्या. त्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील व किसन वीर साखर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांनी गावपातळीवरच्या निवडणुकीत विशेष लक्ष घातले नव्हते. काही गावांत काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात लढती झाल्या. तर अनेक गावांत राष्ट्रवादीच्या दोन गटांत लढत झाली. पसरणी, उडतरे या गावांत काँग्रेस-राष्ट्रवादीची युती पाहावयास मिळाली. त्यांना विरोधकांनी आघाडी करून लढत दिली.बावधनमध्ये सूतगिरणीचे अध्यक्ष शशिकांत पिसाळ व किसन वीर कारखान्याचे संचालक, काँग्रेसचे सयाजी पिसाळ यांच्या गटात निवडणूक झाली. १४ जागा राष्ट्रवादीने दोन काँग्रेसने व एक अपक्ष असे निवडून आले. पश्चिम भागात चिखली येथे काँग्रेसचे बापूसाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने नऊ जागा जिंकून राष्ट्रवादीचा दारुण पराभव केला. गुळुंब येथे चुरशीची लढत झाली. काँग्रेस सहा व राष्ट्रवादीने पाच जागांवर विजय मिळविला. अभेपुरी येथे जयवंत मांढरे यांच्या पॅनेलने बाजी मारली आहे. अनेक ठिकाणी पॅनेल एका पक्षाचे तर सरपंचपदाचे उमेदवार दुसऱ्या पक्षाचे निवडून आले आहेत. सरपंच निवडीच्या वेळी बिनविरोध व अपक्ष निवडून आलेले सदस्य काय भूमिका घेतात? हे महत्त्वाचे ठरणार आहे.
स्थानिक पातळीवरच निवडणूक...
वाई तालुक्यातील निवडणुकीत एकूणच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी विशेषकरून निवडणुका प्रतिष्ठेच्या केल्या नाहीत. त्यामुळे स्थानिक पातळीवर गटा-तटाचे राजकारण झाले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला समान संधी मिळाली आहे.