दृष्टिहीन शिल्पानं रुग्णांना केलं व्याधीमुक्त!

By Admin | Updated: June 27, 2016 00:39 IST2016-06-26T23:13:33+5:302016-06-27T00:39:31+5:30

जपलं जिव्हाळ्याचं नातं : उच्च पदावर पोहोचण्यासाठी स्पर्धा परीक्षेची तयारी

Blind artifacts made the patients sick! | दृष्टिहीन शिल्पानं रुग्णांना केलं व्याधीमुक्त!

दृष्टिहीन शिल्पानं रुग्णांना केलं व्याधीमुक्त!

प्रशांत कोळी--  सातारा असंख्य संकटांवर मात करत, जीवनात काहीतरी वेगळं करून दाखवण्याची धमक फक्त चांगली व्यक्तीच करु शकते असे नाही, तर काही व्यक्ती अशा आहेत की, त्यांना जीवनात मोठं बनायचं आहे, दुसऱ्यांचं आधार बनायचं आहे... आज अशाच एका ‘विशेष’ व्यक्तीचा घेतलेला हा अल्पसा परिचय...
शिल्पा यशवंत बागल. ३२ वर्षीय युवतीचं हे नाव. ती मूळची सातारा तालुक्यातील लिंब गोवे येथील. ती सध्या सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील शासकीय रुग्णालयात आयुर्वेदिक विभागात पंचकर्म विभागात सहायक पदावर कार्यरत आहे. शिल्पा जन्मताच ७५ टक्के अंध असून, तिने शिक्षणाच्या जोरावर अनेक संकटे लिलया पेलली आहेत. तिचा हा प्रवास सर्वांनाच थक्क करणारा आहे.
शिल्पा बागल हिचे पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण मुंबई झाले. दहावीनंतर तिने सहा महिन्यांचा टेलिफोन आॅपरेटिंगचा कोर्स वरळी (मुंबई) येथील विद्यालयात केला. दहावी-बारावीचे शिक्षण अंधेरी येथे पूर्ण केले. ‘द नॅशनल असोसिएशन आॅॅफ ब्लाइंड’ या संस्थेकडून शिक्षणासाठी सर्व सोयी मिळत असे.
पुढे येथीलच लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयातून पदवी अन् समाजशास्त्र तसेच भौतिक उपचारपद्धती यामध्ये डिप्लोमा कोर्स केला.
सध्या जिल्हा रुग्णालयात ती आयुर्वेदिक विभागात पंचकर्म विभागात सहायक पदावर काम करत आहे. भौतिक उपचारपद्धतीत संधीवाताच्या उपचारासाठी आलेल्या रुग्णांना सर्वोत्तम सेवा देण्याचे तिचे कौशल्य वाखाणण्यासारखे आहे.
शिल्पा बागल हिला साताऱ्यात नोकरीची पहिली संधी गिरिजा हॉस्पिटलचे न्यूरो सर्जन सुनील यादव यांनी दिली. याठिकाणी शिल्पाने आपल्या वेगळ्या कामाची छाप उमटविली. शिल्पा सध्या स्पर्धा परीक्षेची तयारीही करत आहे. शिल्पा हिला स्पर्धा परीक्षेसाठी ‘रायटर’ची गरज भासते.


शिल्पा बागल ही एकुलती एक. कुटुंबात आई-वडील असे तिघेजण होते. २०१० मध्ये पोटाच्या कॅन्सरने शिल्पा यांच्यावरील पितृछायाही हरपली. सध्या आई व शिल्पा या दोघीच जीवनात येणाऱ्या संकटांशी दोन हात करू करून जिद्दीने वाटचाल करीत आहेत. तिची ही जिद्द भल्याभल्यांना लाजविणारी आहे.

Web Title: Blind artifacts made the patients sick!