शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

थोरांचे आशीर्वाद ! 'आय लव्ह यू' म्हणणाऱ्या उदयनराजेंचा आजीबाईंनी घेतला 'मुका'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2019 18:50 IST

उदयनराजे आपल्या मतदारसंघातील सर्वसामान्य लोकांशी असलेल्या जवळीकतेनही परिचीत आहेत.

मुंबई - खासदार उदयनराजे भोसलेंची राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्याप उमेदवारी निश्चित नाही. मात्र, त्यांनी आपल्या संपर्क दौऱ्याला सुरुवात केली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन त्यांच्या याबाबत माहिती दिली आहे. उदयनराजेंनी बुधवारी सातारा लोकसभा मतदारसंघातील जावळीतून आपल्या संपर्क दौऱ्याला सुरुवात केली आहे. या दौऱ्यातला उदयनराजेचा एक फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. तर, या दौऱ्यामुळे राजेंनी जणू लोकसभेचं रणशिंगच फुंकल्याचं बोललं जात आहे.  

उदयनराजे आपल्या मतदारसंघातील सर्वसामान्य लोकांशी असलेल्या जवळीकतेनही परिचीत आहेत. सामान्य लोकांसमवेत कुठेही बसणे, गप्पा मारणे, चर्चा करणे ही त्यांची खास वैशिष्टे. शेतीच्या बांधावर बसण्यापासून ते राजसिंहासनावर बसणारा राजा अशी त्यांनी ओळख आहे. उदयनराजेंची हीच ओळख पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. उदयनराजेंनी आपला संपर्क दौरा सुरू केला असून बुधवारी जावळी तालुक्यात भेटी दिल्या. त्यावेळी, ज्येष्ठांपासून ते बालकांपर्यंत त्यांनी अनेकांशी संवाद साधला. या दौऱ्यात एका आजीबाईंनी चक्क मुका घेऊन उदयराजेंना दाद दिली. दरवेळी, आपल्या कार्यकर्त्यांना आय लव्ह यू म्हणणारे आणि कधीकधी कार्यकर्त्यांचा मुका घेणाऱ्या उदयनराजेंचा हा मुका म्हणजे थोरांचे आशीर्वाद व प्रेम आहे. 

वडिलधाऱ्या, वयस्कर लोकांचे मिळणारे आशीर्वाद व प्रेम जनतेसाठी अविरत काम करण्याची ताकद देते, असे ट्विट करत उदयनराजेंनी हा फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. दरम्यान, बुधवारी आपल्या संपर्क दौऱ्यावेळी कुडाळ येथील एका कार्यक्रमात खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे पुन्हा एकदा आमने-सामने आले. यावेळी उदयनराजेंनी शिवेंद्र्रसिंहराजेंचा खांदा दाबला. यावर शिवेंद्र्रसिंहराजेंनी ‘माझा खांदा सारखा का दाबता ? मी अजूनही फिट आहे. हवं तर प्रात्यक्षिक करून दाखवतो,’ असं म्हणत उदयनराजेंना कोपरखळी मारली. दोन्ही राजेंमध्ये झालेल्या या डायलॉगबाजीची तालुक्यात चांगलीच चर्चा रंगली. त्यानंतर, आता उदयनराजेंचा आजीबाईंनी घेतलेल्या मुक्याचा हा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे.

टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेSatara areaसातारा परिसर